Popular Posts

Saturday, 4 July 2015

सारं सारं तेच आहे. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ सारं सारं तेच आहे. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

बाबा, बरंच काही तसंच आहे रे...
बदललेय ते फक्त मुखवटे
वास्तविकतेचे...
तेच चित्र थाटलंय नजरेसमोर, फक्त वेगळ्या रंगात...
तू ओठांवर आहेस सर्वांच्याच,
फक्त शोधू नको मनात...
तीच विषारी व्यवस्था बांधून ठेवू पाहतेय...
फक्त कात टाकलीय आणि नव्या रुपात डसतेय...
वाटतं कधी कधी येत का नाही मरण...
नियमांच्या नावाखाली मांडल्या जाते जेव्हा शब्दांचे सरण...
चहुकडे आसमंतात पसरलेलं निळं रक्त बघ...
बघ आक्रोशाची आग विझवणारे खोटे संस्कृतीचे ढग...
सारं सारं तेच आहे....
दाबल्या जातो मनातला आकांताचा निखारा...
तसाच राहतो ओठांवरचा विद्रोही वादळी वारा...
सारं सारं तेच आहे...

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment