Popular Posts

Saturday, 4 July 2015

खरंच जाणलंस तू मला. ..?

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ खरंच जाणलंस तू मला. ..? ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

खरंच जाणलंस तू मला?
  पाणी लपवून पापण्यांखाली
  ओठांवर हसू फुलविले मी...
  हसणाऱ्या ओठांना सोडून कधी
  डोळ्यांत डोळे टाकून बघितलंस?
  तुझ्याकडे सरसावनारा हात
  तुझ्याच हाताची वाट बघत होता...
  वाटलं नाही कधी?
  बघावं एकदा हात हातात घेवुन?
  गुलमोहराच्या झाडाखाली कितीतरी क्षण
  घालविले असतील न आपण...
  फुलांनी सांगितलं नाही काहीच कधी?
  कितीतरी गोष्टी बोलायच्याच राहून गेल्या...
  न बोलता ही कळतं न तुला?
  मग हिच गोष्ट का नाही कळली?
  तुझ्यापेक्षा ही जास्त चांगल्याने ओळखतो मी तुला,
  असं बोलता बोलता बोलून गेलास...
  पण चालण्याच्या वेगात
  तू जवळुन निघुन गेलास...
  आणि मी राहिली एकटीच मागे
  चुकून बघशील म्हंटलं वळुन एकदा तरी
  पण तू निघून गेलास सरळ
  एकदा ही न बघता वळुन
  अगदी नजरेआड होईपर्यंत...
  खरंच जाणलंस तू मला?

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment