Popular Posts

Saturday, 4 July 2015

हृदयस्पर्शी

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ हृदयस्पर्शी ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

१)
स्वप्नांच्या जगात माझ्या एक फुलांची बाग होती
बागेतल्या त्या कट्ट्यावर फक्त तुझीच मला साथ होती

हातात घेवून तुझा हाथ तिथे कविता मी करत होतो
तुझ्याच प्रेमात ग सजणी वेड्यासारखा मी झुरत होतो

तू स्वप्नातही मला अचानकच सोडून जायचीस
वेड्या ह्या जीवाला माझ्या, एकाकी सोडायचीस

घाबरलेल मन माझ तुला शोधत फिरायचं
थकून भागून बिचार मग एकटच रडायचं

स्वप्नातही कधी तू माझी न झालीस
एकट्याला टाकून मला दूरदेशी गेलीस

दूरदेशीच्या राजकुमारात तू अस काय ग बघितलंस
तुझ्याच ह्या प्रतिबिंबाला अस का ग रडवलस???

आजही तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर शाबूत आहेत
परतीची वाट कधीच नसते रडून मला सांगत आहेत

संदर्भ / मूळ स्त्रोत :
www.maayboli.com/taxonomy/term/8149
-------------------------

२)
चांदण्यांशी बोलता मी,
विषय तूच होता….
चंद्रप्रकाशाचा तेव्हा,
आशय तूच होता….

मग चंद्र मज पुसतो….
कोण ही बला रे?
रूप माझे घेउनिया,
छळते हि तुला रे…..!

नाव तुझे ऐकता,
त्यासी कोण हर्ष होता…!
हर्ष तो जणू तुझा,
प्रेमस्पर्श होता….

भेटतेस मज तू
अशीच चंद्ररुपाने….
बरसतेस मजवरी प्रेम-चांदणे…
रोज तू नव्याने…

संदर्भ / मूळ स्त्रोत :
https://m.facebook.com/kshanpremache/posts/423528971043950

संकलन - विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment