Popular Posts

Saturday, 4 July 2015

पावसातली परी...

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ पावसातली परी... ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

तिला मी पाउसात भिजताना पाहिलं...
  तिला पाहता पाहता माझं मन ओलं होउन राहिलं...
 
  पाउसात भिजतांना ती एका सुंदर परी सारखी दिसत होती...
  ती भिजत असताना कडाडणार्या ढगांची मलाच भीति वाटत होती...
 
  तिच्या चेहऱ्यावरचे पाउसाचे थेंब पाहुन मी खरंच दंग राहिलो...
  माझ्या ओल्या मनाला वाटले आपण फक्त तीच्या प्रेमात पडायचेच राहिलो...
 
  पाउसात तिच्या सोबत माझं काळीज धड़धड़त होतं...
  तिला ओल चिंब पाहुनच माझ झोपी गेलेल मन जाग झालं होतं...
 
  ती ओलिचिम्ब असल्यामुळे तिला देखनेपन आलं होतं...
  त्या देखनेपनाला पाहून माझ्या मनातल्या भावनांना वेड लागलं होतं...
 
  ती इतकी सुंदर दिसत होती की
  तिची उपमा कुणालाही देता येत नाही...
  तो दिवस. ..
  तो क्षण. ..
  मी माझ्या जीवनातून कधीच वजा करणार नाही. ..

© सौरभ किर्दक

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment