Popular Posts

Saturday, 4 July 2015

जुलै आणि साहित्य

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ जुलै आणि साहित्य ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

जुलै २

जन्म
१८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक .
मृत्यू
१९२८ - नंदकिशोर बल , उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार

जुलै ३

जन्म
१६८३ - एडवर्ड यंग, इंग्लिश कवी.
मृत्यू
१३५० - संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ).

जुलै ४

जन्म
१८९६ - माओ दुन , चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.
१९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार.
मृत्यू
१९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.

जुलै ६

जन्म
१८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
१८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार

जुलै ८

जन्म
१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर , मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
मृत्यू
१८२२ - पर्सी बिशे शेली , इंग्लिश कवी

जुलै १०

जन्म
१९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री
१९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी , कथाकार.
मृत्यू
१९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर , गोव्याचे इतिहास संशोधक.

-------------------------

चाफ्याच्या झाडा….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर
बसून आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय…. कळतंय ना….

चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

– पद्मा गोळे

संदर्भ / मूळ स्त्रोत :
http://tyaa-kavitaa.blogspot.in/2014/12/blog-post_50.html

-------------------------

जुलै ११

१८५९ - चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.

जुलै १२

जन्म
१८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे , मराठी इतिहास संशोधक
मृत्यू
२००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री.

-------------------------

सहज सहज टाकुन गेलास ओंजळीमधे
एक ऋणाचा क्षण..
एका जन्मासाठी.
दहा बोटांची उधळली फुलपाखरे
आणि,
पांच प्राणाचे झाले संपुष्ट….
कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

झुंजु मुंजु धुक्यातुन
कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरचा दवाचा थेंब
कधिच का पाहिला नाहीस?
कधिही न ढळणारा तो दवाचा थेंब तुझ्यासाठी.
तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.
कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
फुल चिमणिने सांगितले असेल..

– रंगबावरी, इंदिरा संत

संदर्भ / मूळ स्त्रोत :
https://marathikavitaa.wordpress.com/category/इंदिरा-संत/

-------------------------

जुलै १३

१९१२ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
जन्म
१८५६ - गोपाळ गणेश आगरकर , समाजसुधारक .

जुलै १५

जन्म
१७७९ - क्लेमेंट क्लार्क मूर , अमेरिकन लेखक.
१८७२ - जॉस एन्रिक रोड मॉन्टव्हिडिओ, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ.
१९१९ - आयरिस मर्डोक , आयर्लंडचा कादंबरीकार
मृत्यू
१९४६ - वन यिदुओ , चिनी भाषेमधील कवी, लेखक.

जुलै १६

मृत्यू
१६६४ - अँड्रियास ग्रिफियस, जर्मन लेखक .

जुलै १८

१९२५ - ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
जन्म
१८११ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक .

जुलै १९

जन्म
१८९६ - ए.जे. क्रोनिन , स्कॉटिश लेखक .
१९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.


जुलै २१

जन्म
१८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे , अमेरिकन लेखक .
मृत्यू
१७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.

जुलै २३

जन्म
१८५६ - बाळ गंगाधर टिळक , भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.

जुलै २६

जन्म
१८७४ - शाहू महाराज, समाज सुधारक.
१८५६ - जॉर्ज बर्नार्ड शॉ , आयरिश लेखक.


जुलै २९

जन्म
१६०५ - सायमन डाख, जर्मन कवी.
१९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
मृत्यू
१९८७ - बिभूतीभूषण मुखोपाध्याय,बंगाली लेखक.

संदर्भ / मूळ स्त्रोत :
http://mr.m.wikipedia.org/

© संकलन : विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment