Popular Posts

Tuesday, 9 September 2014

मनोगत...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ मनोगत... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

नमस्कार मित्रांनो,

सर्वप्रथम “मनापासून मनापर्यंत...!” च्या पहिल्या अंकाला मिळालेल्या आपल्या प्रेमाबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद...

कुठे दोन चार लोकांपर्यंतच पोहचणार्या आमच्या कवितांची, आमच्या शब्दांची नाव ई-साहित्याच्या ऐवढ्या मोठ्या महासागरात उतरली खरी... पण तरीही आमचा अगदी स्वतःवरच विश्वास बसत नव्हता... सोबतच मनाला थोडीशी धाकधूक ही होतीच, ती वेगळीच... “मनापासुन मनापर्यंत...!” हि इंटरनेट वरील पहिली त्रै-मासिका नव्हे... ‘आनंदऋतू’, ‘नेटभेट’, ‘नेटाक्षरी’ सारखी कितीतरी ई-मासिके नियमितपणे दर्जेदार मराठी साहित्य आपल्या पर्यंत पोहोचवत आलीत... हिन्दितही अश्या प्रकारची कितीतरी मासिके नियमित साहित्य पुरवठा करत असतात... मराठी आणि हिन्दि या दोन्हि भाषांना एकत्र जोडणारीही हि पहिली मासिका नसावी... पण तरीही आमच्या साठी हि मॅगझिन फार महत्त्वाची आहे... आमच्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे... वाचनात येणार्या काही चांगल्या साहित्याची जोड देवून आम्ही “मनापासून मनापर्यंत...!” ला हिन्दि-मराठी साहित्याच्या संकलिकेच्या रुपात सर्वांसमोर आणलं...

बघता बघता पहिला अंक तयार झाला... तो इंटरनेट वर ही आला... पण आता प्रश्न होता तो इतरांपर्यंत कसा पोहोचेल याचा... अश्या वेळेत सर्वात जास्त मदत झाली ती सोशल नेटवर्किंग ची... ‘व्हाट्सऍप्’, ’फेसबूक’, ’जीमेल’ सारख्या माध्यमांद्वारे आम्ही काही महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत अंक पोहोचविला... या सर्वांच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या... कारण त्यावरच आता पुढची वाटचाल अवलंबून होती...

अपेक्षेप्रमाणे बहुतांश प्रतिक्रिया मिळाल्या... त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया या अंकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत... सगळ्यात पहिली प्रतिक्रिया होती, सुनिल दा ची... आम्ही अंकाची लिंक सुनिल दा पर्यंत पोहोचती केली आणि त्वरीत, म्हणजे अवघ्या १५-२० मिनिटांतच आम्हाला आमची पहिली प्रतिक्रिया मिळाली... त्यानंतर ‘आनंदऋतू’ चे संपादक ‘किमंतु ओम्बळे’ यांची ही प्रतिक्रिया मिळाली... छोट्या-मोठ्या चुका दाखवुन मार्गदर्शन करणार्याही अनेक प्रतिक्रिया लाभल्या... या सर्व प्रतिक्रीया गांभीरतेने घेत आम्ही अनेक बदल करण्याचा प्रयत्न केलाय..... विशेषतः अंक सजावट व मांडणी समितीने यावर विशेष श्रम घेतलेत..... . बहुतांश प्रतिक्रिया भ्रमणध्वनीद्वारे मिळाल्या... पण या सगळ्यात सर्वात महत्वाची प्रतिक्रीया होती ती डाॅ. जयंत वडतकर सर यांची... याला कारण ही तसंच होतं... एक म्हणजे मी पक्षी-निरिक्षण आणि त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली ती सरांच्या ‘रानपिंगळा’ वर दिलेल्या प्रेझेंटेशन मुळे प्रभावित होवून... आणि दुसरं कारण म्हणजे पहिल्या अंकातील ‘रानपिंगळा’ या विषयावर तयार केलेल्या लेखाच्या संकलनातील बराचसा भाग हा सरांच्या मूळ लेखांतूनच घेतला होता... सरांनी फक्त लेख च नाही तर पुर्ण मासिकाच्या निर्मितीबद्दल अभिनंदन केलं... सोबतच पुढ्च्या अंकांसाठी एखाद्या विषयावर माहिती लागल्यास फक्त संपर्क करा असं ही सांगितलं...

सर्वांच्याच प्रतिक्रिया आमच्या साठी अमूल्य आहेत... त्यामुळे मी पुर्ण टीम तर्फे सर्वांचेच मनापासून आभार मानतो... आपलं प्रेम प्रतिक्रिया आणि मार्गदर्शनाद्वारे या पुढेही असंच मिळत राहु द्या...

- विशाल इंगळे

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment