Popular Posts

Tuesday, 9 September 2014

आयुष्य...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ आयुष्य... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  गैलेरीत खुललेली माझ्या
काल गुलाबाची फुलं होती
विखुरलेल्या आयुष्याप्रमाणे माझ्या
आज सारीच हिरमुसलेली होती.....

जेव्हा जेव्हा तुळशी वरचा दिवा
लावण्यास अंगणात गेलो
सरीत अवकाळी पावसाच्या
दिव्यासगट ओला झालो.....

घरामागच्या नदीकाठी
पक्षी उडताना बघितले होते कधी तरी
स्वप्ने वाहताना बघितली
कालच्या पुरात सारी.....

कालपर्यंत जिथे स्वप्नांचा
रंगमहाल होता
घरापेक्षा या स्मशानाच्या
पडक्या भिंतीच ठीक होत्या.....

शेजारचा खाटीक एका घावात कोंबळा मारायचा
मला मात्र नियतीने सोडले फक्त अर्धा गळा कापून
बळि म्हणून दगडाच्या देवासमोर
दिलं तडफडत फेकून.....

चांदोबाच्या लग्नात काल
तार्यांची वरात होती
ढगांआत आज सारी
झाली गडप होती......

स्वप्ने तुटावी तशी सारी
नाती तुटत गेली
आयुष्याच्या पतंगाची
दोर सुटत गेली.....
 
घराकडे जाणार्या रस्त्यावर कमीत कमी काल
काजव्यांचा प्रकाश तरी होता
कुठलं घर, कुनाचं घर
अंधारात कुठेतरी आज
विशालच हरवला होता....
 
रोज अंधारात मी
माझाच शोध घेतो
रात्र, चन्द्र, तारे,
सावलीचा विनोद होतो....
 
दरवेळी स्वतहाच्या मी
सावलीशी लढत असतो
आयुष्य नेहमी जिंकतं
आणि नेमका मी हरत असतो......

काश, मी थोडा
अजुन दुबळा असतो
हरून परिस्थितीशी
मेलो तरी असतो.....

नविन ठिकाणी म्हंटला
फ़ोडेन मी टाहो
सकाळी लक्षात आलं
मी त्याच डबक्यात आहो....
 
अनवाणी चालत होतो तरी
डोक्यावर गीता होती
रात्री झोपलो होतो ज्या ठिकाणी
ती माझ्या शब्दांची चिता होती.....

ज्याच्या मागे धावत होतो
एक चकवा होता
आज कळलं इथे
चुप राहण्यातच शहाणपना होता.....
 
- विशाल इंगळे

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment