Popular Posts

Tuesday, 9 September 2014

दोन शब्द मनापासून...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ दोन शब्द मनापासून... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

नमस्कार मित्रांनो,

मी राहुल, मागील अंकात काही वैयक्तिक कारणात्सव मी काहीच लिहू शकलो नाही... पण दुसऱ्या अंकासाठी मात्र मी मनापासून पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे... विपुल आणि विशाल च्या विशेष आग्रहाखातर हे दोन शब्द लिहीत आहे...

"मनापासून मनापर्यंत...!" म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनातल्या भावना, आठवणी व विचार यांना आपल्या मनापर्यंत पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न... आजच्या धकाधकीच्या जगात, कुणाला वेळ मिळतो आनंदाचे क्षण आठविण्याकरीता...? विशालच्या या त्रै-मासिकाच्या संकल्पनेमुळे असे जुने क्षण आठवायला कारण मिळालं...

आमच्या अटूट मैत्री बद्दल मुद्दामच सांगावसं वाटतं... माझे प्रिय मित्र, तसे टीम मधील सारेच माझे चांगले मित्र आहेत... पण जिवलग आणि लंगोटी यार म्हणता येईल असे मित्र म्हणजे विशाल आणि विपुल... त्यांच्या सोबत घालवलेले सारेच क्षण अविस्मरणीय आहेत... बर्याच वर्षांआधी एका सणानिमित्त माझी विशाल आणि विपुल शी भेट झाली... मैत्री कशी झाली, का झाली? माहीत नाही...! आज आमची मैत्री इतकी घट्ट आहे की आम्ही कधी विचारही केला नव्हता... आम्ही जेव्हाही एकत्र येतो तेव्हा चर्चेचं असं सत्र सुरु असतं की, कोण येतं कोण जातं आणि कोण आमच्या सोबत बोलतं याचं सुद्धा भान नसतं... आमच्या पैकी कुणी ही दोघं एकत्र असले की मग ते कॉल करून मग तिसर्या व्यक्तीस ही बोलावून घेतात... मग एकदा गप्पांचे सत्र सुरु झाले की सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ कधी होते लक्षातच येत नाही... आम्ही जास्तीत जास्त वर्षातून तीन चारदाच भेटतो... नात्यात दुरावा असल्याशिवाय गोडवा निर्माण होत नाही म्हणतात... या अंकामुळे तर आम्ही आणखीणच जवळ आलो...

जेव्हाही आम्ही एकत्र आलो तेव्हा एक वेगळाच विषय निघायचा, आताही असंच झालं... विशालनी इ-त्रैमासिकाची कल्पना सर्वप्रथम आमच्या दोघांसमोर मांडली, तेव्हा आम्ही दोघांनी लगेचच होकार दिला... नंतर टीम चे इतर मित्रपन गोळा झाले आणि सर्वजन अंकाच्या कार्यात लागले... तशी मी पडद्यामागे मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो पण प्रत्यक्ष अंकात मात्र मी काहीच लिहू शकलो नाही... पहिलाच अंक, नवीन कार्यक्षेत्र... सगळ्यांनाच खुप भीती वाटत होती म्हणून विशालनी मागील अंकाच्या मनोगतात "मलाच बळीचा बकरा करण्यात आलं आहे..." असं काहीसं म्हंटलं होतं...

मागील अंकासाठी लाभलेल्या आपल्या प्रतिक्रिया, प्रतिसादांमधील प्रेम आणि स्नेह बघून आम्हाला अतिशय आनंद झाला... सगळ्याच प्रतिक्रीया अतिशय प्रोत्साहनपर आणि मार्गदर्शक होत्या... मागच्या अंकात राहलेल्या उणीवा दूर करून, सुधारित अंक आपणासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे... काही चुकलं, काही उणीवा राहील्यात तर मनापासून कळवा...

- राहुल चोपडे

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment