Popular Posts

Tuesday, 9 September 2014

लोकशाहीपासून राजकारणापर्यंत...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ लोकशाहीपासून राजकारणापर्यंत... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

    लोकशाही म्हंटलं की राजकारण आलं... राजकारण हे देशाच्या विकासाचं कारण आणि आपल्या देशाचा विकास हा उपक्रमातून होतो... उपक्रम म्हंटलं म्हणजे एखाद्या संस्थेकडे एक प्रोजेक्ट देणे, ती एनजीओ तो प्रोजेक्ट तीन किंवा चार वर्षांत पूर्ण करते...

दरवर्षी अनेक उपक्रम अश्या एनजीओ मार्फत चालविले जातात... उदाहरणार्थ, एक सामाजिक विषय घेतला तर पिडीत व्यक्ती किंवा कुटुंबाची किंवा शेतकर्यांची अश्याप्रकारच्या गरजू लोकांची मदत केली जाते... या एनजीओ कडे काही विशेष सरकारी अधिकारी म्हणजेच गवर्नमेंट ऑफ इंडिया चे काही ऑफिसर्स लक्ष पुरवतात... हा उपक्रम ३-४ वर्ष चालतो, या ३-४ वर्षात त्या क्षेत्रात देशाचा विकास होतो असं आपण म्हणु शकतो का?

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, १९५० मध्ये संविधान अंमलात आलं... मग सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर असे अनेक उपक्रम राबविण्यात आले... विकास झाला... पण कसा? तर थेंबे थेंबे तळे साचे असाच...!

हे उपक्रम चालतात तरी कसे? हे उपक्रम काही एनजीओज म्हणजे समाजसेवी संस्था चालवितात... उपक्रम अनेक प्रकारचे असतात... जशी अडचन तसा उपक्रम... उदाहरणार्थ, नियमित येणारे आरोग्य व शेतीविषयक उपक्रम इ. ...
 
यात प्रथम बेसलाइन सर्वे केल्या जातो, म्हणजे या भागात खरच गरज आहे का? हे पाहण्यात येते... याला ६ महीने किंवा एक वर्ष ऐवढा कालावधी लागतो...मग योजना यायला कमीत कमी ४ महीने, आणि सरकारी कागदपत्रे गोळा करण्यास ३ महीने.... म्हणजे प्रत्यक्ष योजनेच्या सुरुवातीसाठी, तळ्यात एक थेंब पडण्यासाठीही २ वर्षे लागतात... अश्याप्रकारे दोन थेंब जीवनाचे असे पोलिओ पाजल्याप्रमाणे सांगुन उपक्रम पूर्ण झाल्याचे जाहिर होते...

यात मजा अशी की समाजसेवी संस्था तीन चार वर्षांत चमकतात आणि समाजसेवक आपली पाठ स्वहाताने ३-४ वृत्तपत्रांना सांगुन थोपाडतात...

३० करोड रुपयाचा फंड ३ वर्षात फस्त करून गरजू व्यक्तींना रोग ग्रस्त करतात...
 
-विपुल वर्धे

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment