Popular Posts

Tuesday, 9 September 2014

काल रात्री स्वप्नांत माझ्या...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ काल रात्री स्वप्नांत माझ्या... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  काल रात्री स्वप्नांत माझ्या चांदोबा आला होता
एकाकिपनाच्या ग्रहनाने पडला काळा होता
 
म्हणे सारं फक्त दुःख तुलाच नाही
सखिशिवाय एकटा आकाशात आहे मी ही
 
कहानिची त्याच्या सुरुवात मग झाली
दारू च्या दोन पेग सोबत स्मशानात च बैठक झाली
 
आयुष्याच्या संगीतातही एक दुःखाचा राग आहे
चंद्र असलो तरी माझ्यावर ही दाग आहे

  गरज असली आपली की सारे जवळ येती
म्हणे, आज काल मित्रा सारी अशी च असतात नाती
 
कुनाशीही जास्त जवळीक साधायची नसते
मैत्री ही आजकाल फक्त कामापुर्ती करायची असते

  दगडाच्या देवापुढे मागतो कसली भीक तू?
आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिक तू

हृदय बंद पडलं की देहाची लाश होते
काही वेळ का हो ना त्याची चिता ही प्रकाश देते

  चितेची करून शेकोटी बसू नको तू बाळ
तुझ्या आयुष्यातही येईल ऊद्या नवी सकाळ
 
- विशाल इंगळे

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment