Popular Posts

Tuesday, 9 September 2014

सोनू निगम - वौइस् ऑफ दि हार्ट...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ सोनू निगम - वौइस् ऑफ दि हार्ट... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  न चूर हो अपने उरूज के नशे में इस तरह,
कभी कभी खुदाओं को भी लगती है बन्दों की बद दुआ...
- सोनू निगम

जन्म : ३० जुलै , १९७३ (वय: ४०)

  जन्म स्थान : फरिदाबाद, हरियाणा, भारत

  गायन शैली : पॉप, रॉक, फिल्मी, शास्त्रीय संगीत, ग़ज़ल, पार्श्वगायन  

वाद्ययंत्र : वोकल्स

  कार्यक्षेत्र : गायक, अभिनेता, संगीतकार, संगीत निर्माता/दिग्दर्शक, रेडियो जॉकी

  सक्रिय वर्ष : 1980–1986 (बालकलाकार), 1993- आतापर्यंत  

रिकॉर्ड लेबल्स : सोनी म्यूजिक, टी-सीरीज, टिप्स, सा रे गा मा, वीनस रिकार्ड्स

  संकेतस्थळ : sonunigam.in  

  सोनू निगम, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय पार्श्वगायक...... जो पर्यन्त जगात "गायन" हा शब्द अस्तित्वात असेल तो पर्यन्त सोनू निगम हे नाव ओठांवर आल्याशिवाय राहणार नाही.... स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खर्या अर्थाने संघर्ष करणारा गायन क्षेत्रातील असा दूसरा व्यक्ती सापडणे शक्य नाही..... गाण्यातून भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट शैलीमुळे जगातल्या महान गायकांच्या यादीत सोनूचं नाव येतं..... थेट ह्रदयापासून ह्रदयापर्यंत पोहोचनार्या आवाजामुळे सोनू आज जगातल्या कितीतरी लोकांच्या मनात घर करून आहेत.....

सोनू निगमचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी फरिदाबाद, हरयाणा येथे झाला...... सोनू निगम साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचे..... सगळ्यात आधी त्यांनी आपल्या वडीलांसोबत मोहम्मद रफ़ी यांचं "क्या हुआ तेरा वादा" हे गानं गायलं होतं..... बालपणातच त्यांनी बऱ्याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला.... संगीत गायनाचे शिक्षण सोनू ने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून घेतले.....

सोनूचं सुरुवातीचं आयुष्य अतिशय धडपडीचं होतं..... वयाच्या साधारण १९ व्या वर्षी सोनू आपल्या वडिलांबरोबर मुंबईत आले..... टी- सिरीज कंपनीचे मालक गुलशन कुमार यांनी त्यांना आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी दिली, पण त्यातही त्यांना मोहम्मद रफीचीच गाणी गाण्यासाठी मिळाली आणि त्यामुळे रफीची नक्कल करीत असल्याचा शिक्का त्यांच्यावर मारला गेला..... हा शिक्का पुसण्यासाठी आणि स्वतःची स्वतंत्र शैली जगाला मान्य करण्यास भाग पाडण्यासाठीही त्यांना बराच संघर्ष करावा.....
१९९० मध्ये त्यांनी "जानम" चित्रपटासाठी पहिले गाणे गायले, पण काही कारणास्तव तो चित्रपट बंद पडला...... दरम्यान, त्यांनी आकाशवाणीवरच्या जाहिरातींना आवाज दिला......

झी वाहिनीच्या सा रे गा मा कार्यक्रमाने त्यांना ओळख दिली मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही..... त्यानंतर "बेवफा सनम" चित्रपटातले त्यांचे "अच्छा सिला दिया तूने" हे गाणे तुफान गाजले.....
सा रे गा मा त सूत्रधाराची भूमिका घेतल्यापासून त्यांना अधिकाधिक गाणी मिळू लागली.....

१९९७ च्या "बॉर्डर" चित्रपटातले "संदेसे आते है" हे त्यांचे गाणे सुपरहिट झाले..... त्यानंतर त्याच वर्षी "परदेस" चित्रपटातले "ये दिल दिवाना" या गाण्याची त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि रफीच्या नकलेचा शिक्का पुसण्यास मदत झाली..... त्यानंतर त्यांची स्वतंत्र शैली सर्वांनीच मान्य केली..... आज सोनू गायकिच्या क्षेत्रात रोल मॉडेल म्हणून गणले जातात.....

"द गोल्डन सिंगर ऑफ़ कर्नाटका" म्हणून मान प्राप्त करणार्या सोनू निगम यांनी कन्नड मध्ये 700 पेक्षा ही अधिक गाणी गायलीत व त्यासाठी अनेक पुरस्कारांचे मानकरीही ठरलेत...... हिन्दिपेक्षा कन्नड़ गाणी च जास्त आवडत असल्याचं त्यांनी "डेक्कन हेराल्ड" या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.....

कन्नड़ आणि हिंदीप्रमाणेच त्यांनी बंगाली, उडिया, पंजाबी, तामीळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, मराठी सारख्या अनेक भाषांतही गाणी म्हटली आहेत....
चित्रपटांतील गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अल्बम्सही केले आहेत..... हिन्दी, उड़िया, पंजाबी और कन्नडा मध्ये त्यांनी पॉप-एल्बम्स काढले आहेत..... १९९९ मध्ये त्यांची पहीली अल्बम 'दीवाना' आली, त्यातली प्रेम-गीते प्रचंड गाजली.... आज पण ही अल्बम भारतातील सगळ्यात यशस्वी अल्बम्स पैकी एक म्हणून गणली जाते..... हिन्दी मधील त्यांची नवीन प्रस्तुती आहे, 'क्लासिकली माइल्ड'..... ही एक अल्प-शास्त्रीय एल्बम आहे.... त्यांनी हिन्दु आणि इस्लामिक धार्मिक एल्बम्स सोबतच, मोहम्मद रफ़ी यांच्या गाण्यांच्याही एल्बम्स काढल्या आहेत.....
२००८ मध्ये त्यांनी 'पंजाबी प्लीज़', आणि 'रफ़ी रेसरेक्टेड' नावाचे मोहम्म्द रफ़ी गीत संग्रह काढले.... ज्यासाठी बर्मिंघम सिम्फ़नी ऑर्केस्ट्रा ने संगीत दिलंय....

"बुद्ध ही बुद्ध है (भाग १ व २)" या बुद्धांच्या जीवन आणि उपदेशांवर आधारीत अल्बम्स साठी तसेच डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्यावर आधारीत "जीवाला जीवाचं दान (भाग १ व २)" या मराठी अल्बम साठी ही आवाज दिला.....

'चन्दा की डोली' या आपल्या अल्बम साठी त्यांनी बरीच गीते लिहिलीत तसंच बर्याच गाण्यांसाठी संगीत-दिग्दर्शन ही केलं.....
कन्नड मधली 'नीने बारी नीने' ही त्यांची शेवटची अल्बम आहे.....
 
दोन दशकांपेक्षा ही जास्तीच्या आपल्या गायन कारकिर्दीत त्यांनी ए.आर. रहमान, अनु मलिक, इलायाराजा, प्रितम, जतीन-ललित, नदीम-श्रवण, विशाल-शेखर, आनंद-मिलिंद, साजिद-वाजिद, सारख्या जवळपास सर्वच जेष्ठ संगीतकारांच्या संगीत निर्देशनात गाणी गायलीत.....
जवळपास सगळ्याच प्रकारच्या आणि भाषेच्या गाण्यांना आवाज देवून सोनू बऱ्याच पुरस्कारांचे मानकरी ठरलेत......

आपल्या कारकिर्दीत त्यांना यूनाइटेड स्टेट्स, यूनाइटेड किंगडम, पाकिस्तान, कैनडा, फ्रांस, बेल्जिअम, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नेदरलैंड, अफगानिस्तान, स्पेन, न्यू ज़ीलैण्ड, बांग्लादेश, नेपाळ, सिंगापुर, नाइजीरिया, साऊथ आफ्रिका सारख्या अनेक देशात आपल्या आवाजाची जादू पसरविन्याची संधी मिळाली. ... २००७ च्या सप्टेंबर आणि ऑक्टोंबर मध्ये कैनडा आणि जर्मनीत "सिम्पली सोनू" या लाइव कॉन्सर्ट मध्ये परफॉर्म करून सोनू लॅटर कन्ट्रीज मध्ये परफॉर्म करणारे पहिले भारतीय गायक बनले.... यूएस बिलबोर्ड अनचार्टेड चार्ट साठी सोनूची दोन वेळा (7 सप्टेंबर आणि ऑक्टोबर 5, 2013) सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणून निवड झाली होती.....
"इंडियन आइडल" आणि "एक्स फैक्टर" या विदेशी स्पर्धेवरून प्रेरीत होवून तयार झालेल्या कार्यक्रमांसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम केलं..... तसंच बर्याच इतर भारतीय कार्यक्रमांसाठी ही त्यांनी परिक्षण केलं आहे.....
काही हिंदी चित्रपटांत त्यांनी नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत... १९८३ मध्ये त्यांनी "बेताब" या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं होतं, त्यानंतर त्यांनी जानी दुश्मन, काश आप हमारे होते आणि लव इन नेपाल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यात..... सचिन पिळगावकरच्या "नवरा माझा नवसाचा" या मराठी चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती..... त्यांनी एकुण १० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.....
२००६ मध्ये त्यांनी रेडियोसिटी ९१.१ एफएम साठी "लाइफ की धुन विथ सोनू निगम" ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं.....

निर्देशक फ़राह ख़ान च्या ‘तीस मार ख़ां’ या चित्रपटातील एक गानं सोनू ने 54 वेगवेगळ्या आवाजात गायलं....

आपल्या आवाजाने जगातल्या करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणार्या सोनू निगम यांना आवाजाची अभूतपूर्व देणगी लाभली आहे..... सोनू निगम म्हणजे आत्मविश्वास, मेहनत आणि धैर्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे.....
- विशाल इंगळे

  I'd say music runs in my blood. My parents are exceptionally talented singers, so even before I was born, it was a known fact to them that I'd become a singer. Thanks to my genes, I started off at the age of three and since then, music has meant everything to me.
-Sonu Nigam

There's only one truth, that everything is a lie.
- Sonu Nigam

“ Am gonna really miss u all, when I am dead”
- Sonu Nigam

पुरस्कार :
 
फ़िल्मफ़ेयर पुरस्कार :

2002 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "साथिया..." – साथिया )
2003 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "कल हो ना हो..." - कल हो ना हो )
 
ज़ी सिने पुरस्कार :

1997 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "संदेसे आते है" – बॉर्डर )
2001 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "सुरज हुआ मध्धम" - कभी ख़ुशी कभी गम )
2002 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "साथिया..." – साथिया )
2013 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "अभी मुझ में कहीं ..." – अग्निपथ )
 
स्क्रीन अवार्ड्स :

1998 - बेस्ट मेल पॉप आर्टिस्ट
2001 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "तनहाई" - दिल चाहता है )
2004 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "तुम से मिल के दिल का" - मै हूँ ना )
2005 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "धीरे जलना" – पहेली )
 
मिर्ची म्यूजिक अवार्ड्स :

2013 - वर्षाचे सर्वश्रेष्ठ गायक ( "अभी मुझ में कहीं ..." – अग्निपथ )
 
राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार :

2004 - सर्वश्रेष्ठ गायक ( "कल हो ना हो..." - कल हो ना हो )
 
आइफा पुरस्कार (अंतर्राष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार ) :

2001 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "सुरज हुआ मध्धम" - कभी ख़ुशी कभी गम )
2002 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "साथिया..." – साथिया )
2003 - सर्वश्रेष्ठ गायक ( "कल हो ना हो..." - कल हो ना हो )
2013 - सर्वश्रेष्ठ गायक ( "अभी मुझ में कहीं ... " – अग्निपथ )
 
फिल्मफेअर अवार्ड्स साउथ :

2007 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक (कन्नड़)
2008 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक (कन्नड़)
 
एमटीवी इम्मिज :

2002 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "साथिया..." – साथिया )
2003 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "मै हूँ ना"-मै हूँ ना )
2004 - बेस्ट पॉप अल्बम ( चन्दा की डोली )
 
  द बैंगलोर टाइम्स फिल्म अवार्ड्स :

2011-12 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक
2012-13 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक
 
एमटीवी स्टाइल अवार्ड्स :

2003 - स्टाइल आइकॉन 2003
2005 - स्टाइल आइकॉन 2005
 
एमटीवी विडियो म्यूजिक अवार्ड्स :

2013 - सर्वश्रेष्ठ गायक ( "अभी मुझ में कही" – अग्निपथ )
 
आनंदलोक अवार्ड्स :

2004 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( बंधन )
2005 - बेस्ट पॉप अल्बम ( चन्दा की डोली )
 
एनुअल सेंट्रल यूरोपियन बॉलीवुड अवार्ड्स :

2007 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( " मै अगर कहूँ" - ओम शांती ओम )
2008 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "इन लम्हों के दामन में" - जोधा अकबर )
2009 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "शुकरान अल्लाह" – कुर्बान )
 
लॉयन्स गोल्ड अवार्ड्स :

2005 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "मै हूँ ना" -मै हूँ ना )
2008 - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "इन लम्हों के दामन में" - जोधा अकबर )
2013 - सर्वश्रेष्ठ गायक ( "अभी मुझ में कहीं ... " – अग्निपथ )
 
इंडियन टेलीविज़न अकैडमी अवार्ड्स :

2005 - सर्वश्रेष्ठ गायक ( मिली )
2008 - सर्वश्रेष्ठ गायक ( अम्बर धारा )
2009 - सर्वश्रेष्ठ गायक ( दिल मिल गये )
 
इतर पुरस्कार :
 
1997 - आशिर्वाद अवार्ड सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "संदेसे आते है" –बॉर्डर )

  1997 - सैनसुई व्यूवर्स चॉइस अवार्ड्स सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "संदेसे आते है" –बॉर्डर )

  2003 - अप्सरा फिल्म प्रोडूसर्स गिल्ड अवार्ड सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक ( "कल हो ना हो..." - कल हो ना हो )

  2005 - स्वरालय येसुदास अवार्ड्स, संगीतातील अभिनव कार्यासाठी

  2005 - टीचर्स अचीवमेंट अवार्ड

  2010 - ग्लोबल इंडियन म्यूजिक अवार्ड, बेस्ट लाइव परफ़ॉर्मर (मेल)

  2011 - ग्लोबल इंडियन म्यूजिक अवार्ड, एमटीवी म्यूजिक यूथ आइकॉन  

2012 - सैंडलवुड स्टार अवार्ड, सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक (कन्नड़)

  2013 - टाइम्स ऑफ़ इंडिया फिल्म अवार्ड्स,वर्षाचे सर्वश्रेष्ठ गायक

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment