Popular Posts

Tuesday, 9 September 2014

पहाटे उठल्या उठल्या...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ पहाटे उठल्या उठल्या... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  रोज पहाटे उठल्या उठल्या,
तिची आठवण येते
आणि आठवण येता येता
हृदयही भरून येते...
 
रोज पहाटे उठल्या उठल्या
एसएमएस तिचा येत होता
आणि एसएमएस तिचा असता वाचत
हसरा चेहरा माझा होत होता
 
रोज पहाटे उठल्या उठल्या
सुप्रभात, प्रेम करते मी तुझ्यावर
असे ती म्हणत होती
मी पण खरंच मनापासून प्रेम करतो तुझ्यावर
माझी पण नकळत च बोटे चालत होती
 
नकळत एक चूक घडली
आणि ती रुसली
खुप समजावलं मी तीला
पण ती न खच बसली
 
माझे अश्रु बघून तीचे
हृदय पाझरले नाही
पण डोळे भरुन आले तीचे आणि म्हणाली
आजपासून तू माझा कुणी नाही
 
माझे डोळे आणि कान ते
बघू ऐकू शकले नाही
हृदय चालू आहे
पण हृदयाचे ठोके चालू नाही
 
तिच्यासोबत घालविलेले सारे क्षण
नजरेसमोर येत होते
तो विचार करुनच हृदय
तळमळत होते

  दोन वर्ष होवून गेली
पहिलं नाही तीला
उद्या तीचा वाढदिवस
कुठे शोधू तीला?
 
कुठे आहे, कशी आहे
माहिती नाही काहीच
आजही वाट पाहतोय पण
ती परत येणार नाही का कधीच?
 
प्रेम करावं तर विश्वासही असावा
आणि प्रेमात कधी गैरसमज नसावा
आता फक्त आठवण आहे
आणि आहे स्वप्न
रोज तिची आठवण येते
आणि होत नाही झोपणं

  आजही वाट पाहतो तिची
हृदय म्हणते येणार ती परत
पण अश्रु येतात डोळ्यात आणि आठवणींमुळे
दिमाग काम नाही करत
 
- प्रफुल इंगळे

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment