Popular Posts

Tuesday, 9 September 2014

सप्टेंबर- साहित्यिक दिनदर्शिका...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ सप्टेंबर- साहित्यिक दिनदर्शिका... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  सप्टेंबर १
जन्म
१८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक .

" A warrior may change his metal, but not his heart. "
- Edgar Rice Burroughs

सप्टेंबर २
जन्म
१८८६ - श्रीपाद महादेव माटे , मराठी साहित्यिक.

  " अर्जुनाचे भय किती खरे होते ते परिणामावरून सिध्द झाले. एवढे प्रचंड दल नष्ट झाले. आणि कुरूक्षेत्रावर तरूण पुरूषांच्या प्रेतांचा खच पडला. थोरामोठयांच्या स्त्रिया रणांगणावर ऊर बडवीत आल्या... या मारामारीच्या परिणामाने अर्जुन दचकला होता. आत्मिक भीती तर त्याला होतीच. तिचा परिहार कृष्णाने केला. पण सामाजिक नरकाची भीती कृष्णाने बिलकुल घालवली नाही. असे असता अर्जुनाने युध्दास तयार व्हावे याचे नवल वाटते."
- श्रीपाद महादेव माटे

मृत्यू
१९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक .

" There is some good in this world, and it's worth fighting for. "
- J.R.R. Tolkien

१९७६ - वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक.

" जग माणसाच्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणुस केवळ प्रेमावर जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी!! त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे. "
- वि.स. खांडेकर
(ययाति)

सप्टेंबर ४
मृत्यू
२०१३ - सुश्मिता बॅनर्जी , भारतीय लेखिका.

सप्टेंबर ६
मृत्यू
१९३८ - सली प्रुडहॉम , नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक .

सप्टेंबर ७
मृत्यू
१९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.

...पडली बग झाकड,लागली जिवास घरची वड
या सम्द्या शिवारातुनी
चिट्पाखरु नाही कुनी
झालं ज्वारं ही बग मुक्यावानी
घरकुलात मैना एकटीच, कर निघायेची तातड...
-भगवान रघुनाथ कुळकर्णी

सप्टेंबर ८
जन्म
१८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.

सप्टेंबर ९
जन्म
१८२८ - काऊंट लिओ टॉलस्टॉय , रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.

"One of the first conditions of happiness is that the link between Man and Nature shall not be broken."
-Leo Tolstoy

मृत्यू
२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते , मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.

सप्टेंबर १०
जन्म
१८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक .
 
सप्टेंबर ११
१९४२ - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.

जन गन मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिश मागे
गाये तव जय गाथा
जन गन मंगलदायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे
-रवींद्रनाथ टागोर

जन्म
१८६२ - ओ. हेन्री, इंग्लिश लेखक.

" Write what you like; there is no other rule. "
- O. Henry

१८८५ - डी.एच. लॉरेन्स , इंग्लिश लेखक .

" People always make war when they say they love peace. "
-D. H. Lawrence  

१८९५ - आचार्य विनोबा भावे , भूदान चळवळीचे प्रणेते.

" प्रेम और विचार में जो शक्ति है वह और किसी में नहीं , किसी संस्था में नही , सरकार में नहीं , किसी वाद में नहीं , शास्त्र में नही , शस्त्र में नहीं । मेरा मानना है कि शक्ति प्रेम और विचारों में ही है । इसलिये पक्के मतों की मुझसे अपेक्षा न करें , विचारों की अपेक्षा रखें । मैं प्रतिक्षण बदलने वाला व्यक्ति हूं , कोई भी मुझ पर आक्रमण कर अपना विचार मुझे समझा कर मुझे अपना गुलाम बना सकता है । पर विचारों को समझाये बिना ही कोई कोशिश करेगा तो लाख कोशिश करे पर भी किसी सत्ता की मुझ पर नहीं चलेगी । "
-आचार्य विनोबा भावे

१९०१ - अनिल उर्फ कवि अनिल.

पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?
पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा
पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात
पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे
पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा
पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून …
-अनिल उर्फ कवि अनिल.

मृत्यू
१९२१ - सुब्रमण्य भारती, तमिळ कवी

"...जिस गांव में पढ़ने की सुविधा नहीं हो, उसे जला डालो..."
-सुब्रमण्य भारती

सप्टेंबर १३
मृत्यू
१९२८ - श्रीधर पाठक , हिंदी कवी.
सप्टेंबर १५
जन्म
१८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक
 
सप्टेंबर १६
जन्म
१९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार

विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी
 
पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान
 
झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी
-ना. धों. महानोर

मृत्यू
१९९४ - जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.
 
"...मनातून काही वाटणं आणि तसं वागणं यात फरक आहे, पंडित! आपण मानसं आहोत! आपण विचार करून लक्ष्मणरेषा आखू शकतो!..."
- जयवंत दळवी
(टाकलेला)

सप्टेंबर १७
जन्म
१८७९ - पेरियार ई.व्ही. रामसामी , भारतीय समाजसुधारक.

"हमारे देश को आजादी तभी मिल गई समझाना चाहिए जब ग्रामीण लोग, देवता ,अधर्म , जाति ओर अंधविश्वास से छुटकारा पा जायेंगे |"
- पेरियार ई.व्ही. रामसामी

१८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
१९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे - कवी, कथाकार, समीक्षक.

"...कविता पुढे वगैरे काही जात नसते. कवीही आपल्या जागीच असतो. कविता स्वत:तच मोठी किवा लहान होते. ग्रामीण कविता, नैसगिर्क कविता, आत्मनिष्ठ कविता असे कवितेचे जे कप्पे पाडतात तेही मला मंजूर नाहीत. वेगवेगळ्या वादांमध्ये साहित्याचे तुकडे पाडता येत नाहीत. हा अकॅडेमिक सोयीसाठी केलेला उपद्व्याप आहे...."
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे

मृत्यू
१९९९ - हसरत जयपुरी , गीतकार.

यारो मुझे मु'आफ़ करो मैं नशे में हूँ
अब थोड़ी दूर साथ चलो मैं नशे में हूँ

  जो कुछ भी कह रहा हूँ नशा बोलत है ये
इसका न कुछ ख़याल करो मैं नशे में हूँ  

उस मैकदे की राह मे गिर जाऊँ न कहीं
अब मेरा हाथ थाम तो लो मैं नशे में हूँ

  मुझको तो अपने घर का पता याद ही नहीं
तुम मेरे आस पास रहो मैं नशे में हूँ  

कैसी गुज़र रही है मुहब्बत में ज़िंदगी
"हसरत" कुछ अपना हाल कहो मैं नशे में हूँ  
-हसरत जयपुरी

२००२ - वसंत बापट, कवी.
 
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll
जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांदयावरती सुतारांचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll
- वसंत बापट

१८ सप्टेंबर
जन्म
१७०९ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.

"Integrity without knowledge is weak and useless, and knowledge without integrity is dangerous and dreadful."
-Samuel Johnson

मृत्यू
१९९५ - काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी

...घुटा करती हैं मेरी हसरतें दिन रात सीने में
मेरा दिल घुटते-घुटते सख्त होकर सिल न बन जाए...
-काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग  

२००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
२००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके , मराठी समीक्षक, साहित्यिक.
 
सप्टेंबर १९
जन्म
१९११ - सर विल्यम गोल्डिंग , नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश लेखक.
 
"The writer probably knows what he meant when he wrote a book, but he should immediately forget what he meant when he's written it."
-William Golding

सप्टेंबर २०
जन्म
१८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
१९२२ - द. न. गोखले , चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
मृत्यू
१९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक
 
दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं
तशी याची मुळं खोलवर
बोधिवृक्षासारखी
बोधिवृक्षाला फुलं तरी आली,
हे झाड सार्या ऋतूंत कोळपून गेलेलं.
धमनी धमनीत फुटू पाहणार्या यातना
महारोग्याच्या बोटांसारखी झडलेली पानं
हे खोड कसलं?
फांदीफांदीला जखडलेली कुबडी
मरण येत नाही म्हणून मरणकळा सोसणारं
दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं...
- दया पवार
(बलुतं)

सप्टेंबर २१
जन्म
१८६६ - एच.जी. वेल्स , अमेरिकन लेखक .

" अनुकूल बनें या नष्ट हो जाएं, अब या कभी भी, यही प्रकृति कि निष्ठुर अनिवार्यता है "
- एच.जी. वेल्स  

मृत्यू
१९ - व्हर्जिल , रोमन कवि.
१९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर , मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.
 
सप्टेंबर २३
जन्म
१९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.
 
सप्टेंबर २४
१९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे ' मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
जन्म
१९२१ - स.गं. मालशे , लेखक व समीक्षक.
मृत्यू
२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी , - शब्दकोशकार, अनुवादक.
 
सप्टेंबर २५
जन्म
१८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
१९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
मृत्यू
१९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
२००४ - अरुण कोलटकर , इंग्रजी व मराठी कवी.
 
सप्टेंबर २६
मृत्यू
१७६३ - जॉन बायरन , इंग्लिश कवी.
१९९६ - विद्याधर गोखले ,मराठी नाटककार, पत्रकार.
 
सप्टेंबर २७
२००२ - मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरूवात.

सप्टेंबर ३०
जन्म
१९७२ - अरी बेह्न , नॉर्वेजियन लेखक
मृत्यू
१९९२ - गंगाधर देवराव खानोलकर , मराठी लेखक .
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment