Popular Posts

Tuesday, 9 September 2014

रश्मिरथी - एक समीक्षा...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ रश्मिरथी - समीक्षा... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  पुस्तक : रश्मिरथी
कवी : रामधारी सिंह "दिनकर"
प्रकाशक : लोकभारती प्रकाशन
प्रकार : महाकाव्य
भाषा : हिंदी

“ विधि ने था क्या लिखा भाग्य में यह खूब जानता हूं मैं,
बाहों को कहीं भाग्य से बलि मानता हूं मैं,
महाराज, उद्यम से विधि का अंक उलट जाता है,
किस्मत का पासा पौरूष से हार पलट जाता है। ”
 
कर्ण नसता तर कदाचित महाभारत "महा"भारत च झाले नसते...

कवी यशवंत मनोहर म्हणतात.....
"मानवी जीवनाच्या विदारक दर्शनाचे सामर्थ्य महाभारताला केवळ कर्णामुळे लाभले आहे."

महाभारतातील एक उपेक्षित पात्र म्हणून कितीतरी लोक कर्णाकडे बघतात.....
त्याचे सर्व हक्क तत्कालीन समाजव्यवस्थेने लहानपणीच हिरावून घेतले.....

कुंतीचं वात्सल्य त्याला लाभलं नाही, योग्यता असताना ही केवळ शुद्र म्हणून द्रोणांनी त्यास धनुर्विद्देचं शिक्षण देण्यास नाकारलं, 'सूतपुत्रास वरनार नाही', असं म्हणून द्रौपदिनेही त्याच्या कर्तुत्वाचा अपमान केला.... तरीही कर्णा सारखा अजेय आणि दानशूर या पृथ्वी तलावावर झालाच नाही.....

स्वतहाला इतक्या वेदनादायी परिस्थितीतुन सावरत.... तत्कालीन समाज व्यवस्थेला लढा देत, कर्तुत्वाच्या आणि क्षमतेच्या बळावर समता आणि अस्मितेसाठी लढत राहणार्या श्रेष्ठ धनुर्धर कर्णाच्या मनाचं विदारक दर्शन महाभारतातुन घडतं..... निच्छितच कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता.. .
कर्णाच्या कर्तुत्वाच्या जोरावरच दुर्योधनाने महायुद्धाचं आव्हान केलं.... कृष्ण, कुंती, इंद्र कर्णाने दुर्योधनाच्या बाजूने लढू नये म्हणून कधी आमिष दाखविताना तर कधी भावनेच्या बळावर त्याचं मन वळविण्याच्या प्रयत्नात दिसतात..... इंद्राने तर ब्राह्मण वेश घेवून त्याच्याकडून कवचकुण्डले ही काढून घेतली.... हे षडयंत्र कर्णाच्या लक्षात आलं नाही असं ही नाही पण फक्त क्षमतेच्या बळावर आपण जिंकु शकतो या आत्मविश्वासासोबत दानशूर कर्णाने इंद्राला कवच कुण्डले ही बहाल केली.....

दुर्योधनाने शुद्र म्हणून अवहेलना न करता त्याचं कर्तुत्व बघून , मित्र म्हणून त्याला जवळ केलं..... म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत कर्ण लढला तो दुर्योधनाच्या बाजूने..... अगदी पांडव आपले भाऊ आहेत हे माहीत असतानाही..... असं असतानाही कर्णाने अर्जुन व्यतिरिक्त इतर पांडवाना काही ही होउ देणार नाही असं वचनही कुंतीला दिलं..... कर्णातल्या माणुसकीची जाणीव होते ती यावरूनच.....

खुद्द कृष्ण पाठीमागे असताना सुद्धा अर्जुनाने शापित आणि निशस्त्र कर्णाचा ज्या पद्धतीने नियमां विरुद्ध जाऊन अंत केला, त्यावरून अर्जुनाची कीव येते आणि कर्णाचं श्रेष्ठत्व समोर येतं.....

द्रौपदी बद्दल आवेशात कर्ण नको ते बोलून गेला, मान्य! पण त्यानंतर आयुष्यभर तो पश्चातापाच्या आगीत जळत होता...... आतल्या आत घुटमळत होता..... फक्त जातीमुळे द्रौपदिने त्याच्या कर्तुत्वाचा अपमान केला हे कितपत योग्य होतं?..... निशस्त्रावर बाण चालविन्यात अर्जुनाचा कुठला पुरुषार्थ? कुठलं कर्तुत्व?.....

युद्धाच्या सतराव्या दिवशी पूर्ण संधी असतानाही कर्णाने अर्जुनावर बाण चालवला नाही, कारण ते नियमांच्या विरुद्ध ठरलं असतं...... कुंतीला दिलेल्या वचनाखातर नागास्त्राचा उपयोग ही फक्त एकदाच केला..... यातून कर्णाची नैतिकता दिसून येते....,

कर्णाची वचनबद्धता, दानशूरता, मित्रता, नैतिकता, शूरता, बुद्धिमत्ता,कृतज्ञता सर्वच इतरांना लाजवेल असंच आहे.....

कर्णाच्या मृत्यूने महाभारत संपलं, कर्णाचा अंत झाला तो अर्जुनाच्या बाणाने, पण कर्ण हरला नाही आणि अर्जुन जिंकला नाही..... कर्ण अजेय च राहला, महाकाव्यातही आणि आपल्या मनातही....

अर्जुनाला सर्व काही जन्मतःच मिळालं याउलट कर्णाला काही च मिळालं नाही अगदी ज्यावर त्याचा हक्क होता ते ही..... कर्णाने मिळवलं ते सारं च कर्तुत्वाच्या जोरावर.....
म्हणून खर्या अर्थाने कर्णच महाभारताचा नायक ठरतो.....

माझ्यासारख्याच दृष्टिकोनातून कर्णाकडे बघणारे असंख्य लोकं आहेत..... तर याविरुद्ध कर्णावर प्रश्नचिन्ह उचलणारे ही अनेक सापडतील..... माझ्यासाठी मात्र कर्ण हा नेहमीच एक नायक म्हणून आहे....

कर्णाला समजुन घेण्याच्या प्रयत्नात अनेक साहित्यिकांनी बरंच काही लिहिलं...... मृत्युंजय,कर्णायन,शम्बूक-कर्ण-एकलव्य सारख्या कितीतरी कलाकृती कर्णाला मध्यवर्ती ठेवून निर्माण झाल्यात..... रामधारी सिंह दिनकर यांची रश्मिरथी ही अशीच एक अमर कलाकृती.....

रश्मिरथी ही महाकाव्यावर कर्णाला मध्यवर्ती ठेवून रचलेली ह्रुदयस्पर्शी रचना.... एव्हाना रश्मिरथी सुद्धा एक महाकाव्यच आहे.....
राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर यांनी महाभारतावरून प्रेरित होवून रश्मिरथी व्यतिरिक्त कुरुक्षेत्र, हिमालय, परशुराम की प्रतीक्षा सारख्या अनेक हिंदी रचनांची निर्मिती केली..... त्यांच्या कवितांमधून दिसून येते ते म्हणजे आक्रोश, क्रांती, विद्रोह आणि भावनांचं अभूतपूर्व मिश्रण. ... त्यांच्या कवितेतून व्यक्त होतो तो वीर रस..... म्हणूनच माझ्या सर्वात आवडत्या कविंमध्ये त्यांचा समावेश आहे..... रश्मिरथी ही माझ्या मनाला भिडलेली सर्वात आवडती रचना. .. रश्मिरथी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून महाभारताचीच कहानी आहे..... कथा तीच आहे, नवीन आहे ती म्हणजे पुर्ननिर्मितीची शैली.....

कवीने सात खंडात विभागलेल्या या रचनेच्या सुरुवातीलाच म्हणजे कथावस्तुतच स्पष्ट केलंय की रश्मिरथी ( असा व्यक्ती ज्याचा रथ रश्मि म्हणजेच सुर्याच्या किरणांचा असतो ) नावाचं प्रयोजन हे कर्णासाठी केलेलं आहे, कारण कर्णाचं चरित्र हे सुर्यासमान तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे.....

  “ जय हो' जग में जले जहाँ भी, नमन पुनीत अनल को,
जिस नर में भी बसे, हमारा नमन तेज को, बल को।
किसी वृन्त पर खिले विपिन में, पर, नमस्य है फूल,
सुधी खोजते नहीं, गुणों का आदि, शक्ति का मूल। “
 
या शब्दांत कवीने कर्णास नमन करून, त्याच्या कर्तुत्वाला नमन करून या सुन्दर आणि ह्रुदयस्पर्शी रचनेस सुरुवात केली आहे.....

दानी, भावनाप्रधान, शूरवीर कर्णाच्या कर्तुत्वाचं वर्णन करताना अगदी सुरुवातीच्याच या काही पंक्तीत कवीने कर्णाचं सुन्दर व्यक्तिचित्र रेखाटलं.....

  “ जिसके पिता सूर्य थे, माता कुन्ती सती कुमारी,
उसका पलना हुई धार पर बहती हुई पिटारी।
सूत-वंश में पला, चखा भी नहीं जननि का क्षीर,
निकला कर्ण सभी युवकों में तब भी अद्भुत वीर।
तन से समरशूर, मन से भावुक, स्वभाव से दानी,
जाति-गोत्र का नहीं, शील का, पौरुष का अभिमानी।
ज्ञान-ध्यान, शस्त्रास्त्र, शास्त्र का कर सम्यक् अभ्यास,
अपने गुण का किया कर्ण ने आप स्वयं सुविकास। ”
 
कवी रश्मिरथीत समतेचा पुरस्कार करतात, जातीभेदाचा विरोध कवी या पंक्तिंद्वारे करताना दिसतात.....
 
“ ऊँच-नीच का भेद न माने, वही श्रेष्ठ ज्ञानी है,
दया-धर्म जिसमें हो, सबसे वही पूज्य प्राणी है।
क्षत्रिय वही, भरी हो जिसमें निर्भयता की आग,
सबसे श्रेष्ठ वही ब्राह्मण है, हो जिसमें तप-त्याग।
तेजस्वी सम्मान खोजते नहीं गोत्र बतलाके,
पाते है जग से प्रशस्ति अपना करतव दिखलाके।
हीन मूल की ओर देख जग गलत कहे या ठीक,
वीर खींचकर ही रहते हैं इतिहासों में लीक। ”
 
सूतपुत्र म्हणून द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकविण्यास नकार दिला..... पण तरी ही कर्ण खचला नाही..... कठिन परिश्रम घेवून कर्णाने युद्ध कौशल्यात नैपुण्य मिळवलं..... शस्त्रास्त्रांचं शिक्षण घेवून जेव्हा पांडव आणि कौरव परतले आणि आपल्या युद्ध कौशल्याचं प्रदर्शन जनतेसमोर करत होते..... तेव्हा त्यांच्यापैकी सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानल्या जाणार्या अर्जुनाला कर्णाने खुलं आव्हान दिलं.......
 
'“ तूने जो-जो किया, उसे मैं भी दिखला सकता हूँ,
चाहे तो कुछ नयी कलाएँ भी सिखला सकता हूँ।
आँख खोल कर देख, कर्ण के हाथों का व्यापार,
फूले सस्ता सुयश प्राप्त कर, उस नर को धिक्कार।' “
 
पण इथेही कृपाचार्यानी जातीचं बंधन निर्माण केलं..... कर्णाला जात विचारल्या गेली..... लहानपणीपासूनच जातिभेदाचे चटके सहन करणार्या कर्णाच्या मनाचा आकांत कवी पुढील पंक्तीत व्यक्त करतात.....

  “ 'जाति! हाय री जाति !' कर्ण का हृदय क्षोभ से डोला,
कुपित सूर्य की ओर देख वह वीर क्रोध से बोला
'जाति-जाति रटते, जिनकी पूँजी केवल पाखंड,
मैं क्या जानूँ जाति ? जाति हैं ये मेरे भुजदंड।
'मस्तक ऊँचा किये, जाति का नाम लिये चलते हो,
पर, अधर्ममय शोषण के बल से सुख में पलते हो।
अधम जातियों से थर-थर काँपते तुम्हारे प्राण,
छल से माँग लिया करते हो अंगूठे का दान। ”
 
दुर्योधनाने मात्र कर्णा ची क्षमता ओळखली..... आणि अंग देशाचा राजा बनवून कर्णाला जवळ केलं..... यामुळे कर्ण-दुर्योधनाच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि कर्ण शेवटच्या श्वासापर्यंत दुर्योधनाचा ऋणी राहला.....
 
“ 'भरी सभा के बीच आज तूने जो मान दिया है,
पहले-पहल मुझे जीवन में जो उत्थान दिया है।
उऋण भला होऊँगा उससे चुका कौन-सा दाम?
कृपा करें दिनमान कि आऊँ तेरे कोई काम।' “
 
कर्णाच्या क्षमतेला इतर ही काही जनांनी हेरलं होतं, त्यापैकीच एक होते द्रोणाचार्य..... कर्णाच्या युद्ध कौशल्याबाबत द्रोणाचार्य अर्जुनाला उद्देशून बोलताना दिसतात....
 
“ 'मगर, आज जो कुछ देखा, उससे धीरज हिलता है,
मुझे कर्ण में चरम वीरता का लक्षण मिलता है।
बढ़ता गया अगर निष्कंटक यह उद्भट भट बांल,
अर्जुन! तेरे लिये कभी यह हो सकता है काल! ”
 
तेरा वर्षांच्या अज्ञातवासानंतर पांडव परतले तेव्हा कृष्ण त्यांच्या वतीने फक्त पाच गावांची मागणी घेवून दुर्योधनाच्या भेटीस गेले..... पण दुर्योधनाने त्यांची ही मागणी नाकारली उलट त्यांना अपमानित ही केलं..... जेव्हा कृष्ण इंद्रप्रस्थ साठी परतीस निघाले तेव्हा कर्ण आदरपूर्वक त्यांना काही दूर सोडण्यास आला..... फक्त कर्ण च अर्जुनाला पराभूत करू शकतो याची कृष्णालाही पूर्ण जाणीव होती म्हणून कृष्ण कर्णाला पांडवांकडे खेचन्याच्या प्रयत्नात दिसतात.....
 
“ "कुन्ती का तू ही तनय ज्येष्ठ,
बल बुद्धि, शील में परम श्रेष्ठ
मस्तक पर मुकुट धरेंगे हम,
तेरा अभिषेक करेंगे हम
आरती समोद उतारेंगे,
सब मिलकर पाँव पखारेंगे। ”
 
पण
 
“ "सम्राट बनेंगे धर्मराज,
या पाएगा कुरूरज ताज,
लड़ना भर मेरा कम रहा,
दुर्योधन का संग्राम रहा,
मुझको न कहीं कुछ पाना है,
केवल ऋण मात्र चुकाना है। ”
 
या शब्दांत सर्व आमिष नाकारून कर्ण फक्त मैत्री साठी शेवटच्या श्वासापर्यंत दुर्योधनाच्या बाजूने लढण्याची इच्छा व्यक्त करतो.....

पांडवांना हे चांगल्या रितीने माहीत होतं की जो पर्यंत कर्णाजवळ दिव्य कवच कुण्डलं आहेत कर्णाला युद्धभूमीत पराजित करने अशक्य आहे, म्हणून इंद्राने ब्राह्मण वेशात येवून कर्णाकडून कवच कुण्डलं मागून घेतली..... हे षडयंत्र कर्णाच्या लक्षात येवून ही दानशूर कर्णाने इंद्राला कवच कुण्डले बहाल केली......
 
“ 'अब ना कहेगा जगत, कर्ण को ईश्वरीय भी बल था,
जीता वह इसलिए कि उसके पास कवच-कुंडल था।
महाराज! किस्मत ने मेरी की न कौन अवहेला?
किस आपत्ति-गर्त में उसने मुझको नही ढकेला?
'भुज को छोड़ न मुझे सहारा किसी और सम्बल का,
बड़ा भरोसा था, लेकिन, इस कवच और कुण्डल का।
पर, उनसे भी आज दूर सम्बन्ध किये लेता हूँ,
देवराज! लीजिए खुशी से महादान देता हूँ। ”
 
हे कर्णाच्या आयुष्यातील सर्वात मोठं दान मानल्या जातं......

कृष्ण कर्णाला समजावण्यास असफल झाल्यानंतर कुंती कर्णाच्या भेटीस गेली..... त्यांच्या मध्ये झालेल्या संभाषणाने कर्ण भावुक झाला..... अर्जुन सोडून इतर पांडवांना काही ही होवू देणार नाही असं आश्वासन ही दिलं....
 
‘‘मैं एक कर्ण अतएव, माँग लेता हूँ,
बदले में तुमको चार कर्ण देता हूँ।
छोडूँगा मैं तो कभी नहीं अर्जुन को,
तोड़ूँगा कैसे स्वयं पुरातन प्रण को ?
पर, अन्य पाण्डवों पर मैं कृपा करूँगा,
पाकर भी उनका जीवन नहीं हरूँगा।
अब जाओ हर्षित-हृदय सोच यह मन में,
पालूँगा जो कुछ कहा, उसे मैं रण में।’’

कर्ण विपरीत परिस्थितीत लढत राहिला.. ... कुंतीला दिलेल्या वचनाखातर इतर पांडवांना जिवंत सोडून दिलं, नागास्त्राचा उपयोग ही एकदाच केला..... कर्ण नैतिकतेने लढला....
कर्णाच्या मृत्युनंतर स्वतः कृष्ण ही म्हणतात....
 
“ 'युधिष्ठिर! भूलिये, विकराल था वह ,
विपक्षी था, हमारा काल था वह।
अहा! वह शील में कितना विनत था?
दया में, धर्म में कैसा निरत था !'
'समझ कर द्रोण मन में भक्ति भरिये ,
पितामह की तरह सम्मान करिये।
मनुजता का नया नेता उठा है।
जगत् से ज्योति का जेता उठा है !' “

रश्मिरथीतून कविंनी साकारलाय एक सभ्य, आत्मनिर्भर आणि संवेदनशील कर्ण...... जो तत्कालीन व्यवस्थेचा निषेध करतो, स्त्रियांचा सन्मान करतो..... मैत्री आणि नैतिकतेचं आदर्श उदाहरण निर्माण करतो.....
कर्णाच्या विदारक आणि कारुण परिस्थितीचं आणि त्याच्या मानसिकतेचं वर्णन कविंनी ज्या पंक्तीत केलंय त्या अतिशय ह्रदयस्पर्शी आहेत,मर्मस्पर्शी आहेत....
कर्णाच्या निमित्त्याने कवींनी दलित, पीड़ित आणि उपेक्षितांच्या उद्धाराचा आदर्श रचनेतून साकारला.....
रश्मिरथीत खुद्द कर्णाच्या तोंडून निघाले आहे......
 
“ फिर कहता हूं नहीं व्यर्थ राधेय यहां आया है,
एक नया संदेश विश्व के हित वह भी लाया है।
मैं उनका आदर्श, कहीं जो व्यथा न खोल सकेंगे
पूछेगा जग, किन्तु पिता का नाम न बोल सकेंगे,
जिनका निखिल विश्व में कोई कहीं न अपना होगा,
मन में लिये उमंग जिन्हें चिर-काल कलपना होगा। ”
 
मानवतावादाच्या निर्मीतीचा प्रामाणिक प्रयत्न रश्मिरथी द्वारे कवी दिनकर यांनी केला आहे......
दिनकर यांना पहिल्यांदाच वाचणार्यांनाही ही रचना त्यांच्याशी जोडते, कर्णाशी जोडते, त्याच्यातल्या माणूसकीशी जोडते आणि मनाशीही......

थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व साहित्यप्रेमींसाठी दोन च शब्द....

"मस्ट रीड....!"

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचण्यासाठी संकेतस्थळ :  
http://kavitakosh.org/kk/रश्मिरथी_/_रामधारी_सिंह_%22दिनकर%22

---*---

सप्टेंबर २४, १९९५ रोजी “मृत्युंजय” या कर्णाच्या जीवनावर आधारीत कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना “भारतीय ज्ञानपीठ” या संस्थेतर्फे “मूर्तिदेवी पुरस्कार” जाहीर...

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment