Popular Posts

Tuesday, 9 September 2014

महाकाव्य

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ महाकाव्य ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

महाकाव्य लिहिणार्र्याने
जवळून बघितली असेल
धर्मव्यवस्था
अन्यायी वर्णव्यवस्था.....
बंधनाच्या
धर्माच्या खोट्या
चौकटिच्या
बाहेर निघण्याचा
प्रयत्न ज्यांनी केला
धर्मव्यवस्थेने या
त्यांच्या कौशल्याचा घात केला.....
महाभारत ही त्यांच्या
कौशल्याची गाथा
बंडाची
त्यांच्या
दुःखद प्रवासाची कथा.....
नायक कर्ण-एकलव्य
होते स्वाभिमानी
जे मिळवले त्यांनी
मिळवले
सर्वच कौशल्यानी
स्वबळानी
कर्तुत्वानी.....
शुद्र म्हणुन त्यांना
हक्कच मिळाले नाही
दानशूर
निस्वार्थी
कर्तुत्ववानांनी
कधी ते मागितले ही नाही.....
व्यवस्थेविरोधी बंड करणारे
ते
समतेचे नेते होते
गुणवत्ते पुढे त्यांच्या
सारे
झाले दुबळे होते.....
अधर्मास धर्म ठरवून
नियमांविरुद्ध जाऊन
त्यांचा घात केला गेला
महाकाव्याचा या असा
दुःखद
दुर्दैवी अंत झाला.....
 
- विशाल इंगळे

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment