Popular Posts

Thursday, 18 September 2014

अंक दुसरा, काही निवडक प्रतिक्रीया...


मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ अंक दुसरा, काही निवडक प्रतिक्रीया... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

१) ई साहित्य प्रतिष्ठान :


अतिशय सुंदर अंक.
आणि अत्यंत भारी कंटेंट. सर्व वाचून झालेलं नाही. पण रश्मिर्थी आणि आंबेडडकरी चलण वाचल्यावाचल्या आवडले. पूर्ण वाचून कळवतो.
थांबू नका.
पुढच्या अंकासाठी माझी एक कविता पाठवत आहे.

तू चालत रहा
तू चालत रहा तू चालत रहा
तू चालत रहा तू चालत रहा
कधी सरळ सरळ कधी वक्र वक्र
पायावर भंवरी चक्र चक्र
कधी सुम सुसाट कधी बिन बोभाट
कधि लपत छपत कधी गजबजाट
तू चालत रहा…
घाल खडावा, घाल रिबॉक, पदयात्रा किंवा मॉर्निंग वॉक
बन मिरवणूक, कर करमणूक, चल धक्क्याने वा आपसूक
तू ठरव ध्येय, तू दिशा ठरव, तू जवळ लांबचा मार्ग ठरव
चल नीघ अता, का उशीर मिता,
घे किक स्टार्ट, सुट भन्नाट तू
तू चालत रहा …
जग वाट पहातंय सुर्याची, तू नम्रपणे सुरुवात तो कर
जो रोल मिळाला उचल गड्या, ये स्टेजवरी तू बनठनकर
शिवधनुष्य प्रत्येकाच्या आयुष्याचे असते अलग अलग
तू उचल तुझे, बन अग्नीबाण, प्रत्यंचा ओढून धडक धड्क
तू स्वतःच बन मग ब्रह्मबाण, तोडून जीव, घेऊन आण
तू चालत रहा
तू चिल्लर खुर्दा बनू नको, चल महायज्ञ आरंभ तू कर
तू विवेकानंद बन, किंवा गांधी, शिवाजी वा आंबेडकर
जर व्यापारी, बन बिल गेटस, खेळामध्ये बन तेंडुलकर
जर कवि लेखक बनणार गड्या, नोबेलखाली तडजोड न कर
बघ पक्ष्याच्या डोळ्यामध्ये, तू लक्ष्य बनव, अन नेम धरून
तू चालत रहा

सुनिल सामंत
ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
एक प्रसन्न अनुभव
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment