Popular Posts

Tuesday, 24 June 2014

श्रेया घोषाल - voice of the hearts

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


श्रेया घोषाल - voice of the hearts

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

"I do not have a problem with what I feel are bad lyrics. But I cannot sing double-meaning songs and worse."
- Shreya Ghoshal
 
जन्म : १२ मार्च , १९८४ (वय: ३०)
जन्म स्थान : बहरामपूर, पश्चिम बंगाल
व्यवसाय : पार्श्वगायिका
गायन शैली : फिल्मी, हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, ग़ज़ल
वाद्ययंत्र : वोकल्स
सक्रिय : वर्ष 1998–वर्तमान
रिकॉर्ड लेबल : Sagarika
वेबसाईट : www.shreyaghoshal.com
 
गौरव पुरस्कार:
राष्ट्रीय पुरस्कार (२००३, २००६, २००८, २००९)
फिल्मफेअर पुरस्कार (२००३, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२)
 
श्रेया घोषाल...... संगीत क्षेत्रातील एक विख्यात नाव..... गायन किंवा संगीत वेड्या लोकांनी जर श्रेयाचं नाव ऐकलं नसेल तर नवलंच......
माझ्या स्वतहाबद्दल च सांगायचं झालं तर श्रेया हि माझी सर्वांत आवडती सिंगर...... लता दिदिंनंतर त्यांच्या सारखीच शैली असणारी एकमेव गायिका म्हणजे श्रेया......! श्रेया चा आवाज सरळ ह्रुदयाला स्पर्श करुन जातो...... आज अंक प्रकाशित करताना मुद्दाम सांगावसं वाटतं आणि अतिशय आनंद हि होतोय, 26 जुन हा युनायटेड स्टेट ओफ ओहिओ तर्फे दरवर्षी संपुर्ण जगात "श्रेया घोषाल डे" म्हणुन साजरा केला जातो..... आज आपल्या आवडत्या गायिकेबद्दल या अंकात लिहिण्याची संधी मिळाली हि माझ्यासाठि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे......

श्रेया घोषाल ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका आहे. हिंदी (715 गाणी) सोबतच तिने तेलुगू (183 गाणी) , कन्नड (159 गाणी) , तमिळ (127 गाणी) , बंगाली (120 गाणी) , मल्याळम (47 गाणी), आसामी, गुजराती, मराठी, नेपाली, ओरीया, आणि पंजाबी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
श्रेयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली ती "सा रे ग म प" ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा जिंकल्यानंतर..... देवदास या हिंदी चित्रपटातून तिने पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्टपार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार तसेच फिल्मफेयर आर.डी. बर्मन संगीत क्षेत्रातील नवकलाकार पुरस्कार मिळाले. तेंव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार , ५ फिल्मफेयर पुरस्कार व ७ दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. मिळाले. तेंव्हापासून तिने सुमारे २००चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत
श्रेया मार्च १२, १९८४ रोजी बहरामपूर येथील बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्ली. ती रावतभाटा या राजस्थानातील छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण कोट्यातील महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले. तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म प ही झी टीव्हीवरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या कल्याणजी यांनी तिच्या पालकांना मुंबईत येण्याबद्दल सांगितले. मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले. ती आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, रावतभाटा आणि आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, अणुशक्तिनगर (मुंबई) या शाळांत शिकली. शाळेनंतर एसआयईएस कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. श्रेया सद्ध्या साहित्यात एम. ए. करण्याची तयारी करतेय.....

चित्रपट निर्देशक संजय लीला भंसालीचं लक्ष श्रेयाकडे खेचल्या गेलं जेव्हा तिने "सा रे गा मा पा" मध्ये दुसर्र्यांदा भाग घेतला...... या वेळेस तिची स्पर्धा होती व्ययस्क गायकांसोबत...... वर्ष 2000 मध्ये, त्यांनी आपल्या देवदास चित्रपटातील मुख्य महिला पात्र पारो साठि आवाज देण्याच्या संधीचा प्रस्ताव मांडला.....चित्रपटात श्रेया नी इस्माइल दरबार च्या संगीत निर्देशनात पाच गाणी गायलीत..... जगभरातुन चित्रपट दर्शकांनी एश्वर्या राय वर चित्रित झालेली, श्रेया ची गाणी एकलीत..... आणि लवकरच बॉलीवुड मध्ये अलका याज्ञिक, सुनिधि चौहान, साधना सरगम और कविता कृष्णमूर्ति सोबत एक आघाडिची पार्श्वगायिका बनली.....
देवदास नंतर, ए. आर. रहमान , अनु मलिक , हिमेश रेशमिया , मणि शर्मा, एम. एम. किरावनी, नदीम-श्रवण , शंकर-एहसान-लॉयल , प्रीतम , विशाल-शेखर , हंसलेखा, मनो मूर्ति, गुरुकिरण, इल्लया राजा , युवन शंकर राजा आणि हैरीज जयराज सोबतच अनेक संगीत निर्देशकांच्या निर्देशनात अनेक अभिनेत्रिंसाठि गात आहे......

उत्तर और दक्षिण फिल्म चित्रपट स्रुष्टितील योगदानासाठि श्रेया अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलीय.....अमूल स्टार वॉयज ऑफ इंडिया छोटे उस्ताद संगीत कार्यक्रमात ती निर्णायकाच्या रूपात आली.... . तिने अनेक भारतीय टीवी धारावाहिकांसाठी शीर्षक गीते पण गायलीत......
श्रेयाच्या आवाजात एक जादु आहे.... ती रोमंटिक गाणी ज्या अप्रतिमपणे, आणि सुंदरतेने गाते, प्रशंसनीय आहे..... याचंच एक उदाहरण म्हणजे जिस्म चित्रपटातील "जादू है नशा है"....

2007 मद्ध्ये गायलेल्या गाण्यांबद्दल ती ला सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचा आइफा (IIFA) पुरस्कार मिळाला, 2008 मद्ध्ये तीचं नाव पाच पैकी चार नामांकनात आलं...... 2009 मद्ध्ये सर्वश्रेष्ठ गायिकेचा फ़िल्मफ़ेयर पुरस्कार आणि सिंग इज किंग मद्ध्ये प्रीतमच्या `तेरी ओर' साठि आइफा (IIFA) पुरस्कार मिळाला..... श्रेया हिंदी चित्रपटातील एकमेव अशी गायिका आहे, जी 25 वर्षांच्या वयातच तीन राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी ठरली....
2013 मध्ये, अरजित सिंग, ए.आर.रेहमान,आतीफ असलम आणि मोहित चौहान सारख्या दिग्गजांच्या लागोपाठ "सावन" वर ची सर्वांत आवडती कलाकार बनली...... फोर्ब्स च्या विख्यात 100 सिलिब्रिटिंच्या यादित श्रेयाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे......
श्रेयाचा आवाज हा बर्र्याच पैकि लता दिदिंच्या आवाजाशी मेळ खातो..... आणि श्रेया लता दिदिंना नेहमीच आपल्या आदर्श मानते..... प्रसिद्ध गायक जावेद अली, पलक मुछछल चित्रपटस्रुष्टितील आपल्या सर्वात आवडत्या गायिका म्हणुन श्रेयाचं नाव घेतात....
 

पुरस्कार व मान्यता :
 
नैशनल फिल्म अवॉर्ड्स :
2002: नैशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर - बैरी पिया (देवदास )
2006: नैशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर - धीरे जलना (पहेली )
2007: नैशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर - ये इश्क है (जब वी मेट )  

आइफा (IIFA) अवॉर्ड्स :
2003: आइफा (IIFA) बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड—डोला रे (देवदास)
2004: आइफा (IIFA) बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड - जादू है नशा है (जिस्म)
2008: आइफा (IIFA) बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड- बरसो रे (गुरु)
2009: आइफा (IIFA) बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड - तेरी ओर (सिंह इस किंग)  

फ़िल्मफ़ेयर अवॉर्ड्स :
2003: फ़िल्मफ़ेयर आर॰ डी॰ बर्मन अवॉर्ड फॉर न्यु म्यूजिक टैलेंट
2003: फ़िल्मफ़ेयर बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड- डोला रे (देवदास )
2004: फ़िल्मफ़ेयर बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड - जादू है नशा है (जिस्म )
2008: फ़िल्मफ़ेयर बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड - बरसो रे ( गुरु )
2009: फ़िल्मफ़ेयर बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड - तेरी ओर ( सिंह इस किंग) फ़िल्मफ़ेयर अवॉर्ड्स साउथ
2007: फ़िल्मफ़ेयर बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड (तमिल) - मुन्बे वा (सीलुनु ओरु काढाल)
2008 : फ़िल्मफ़ेयर बेस्ट फिमेल प्लेबैक अवॉर्ड (कनाडा) - निंना नोदालेंत्हू - ( मुस्सनजेमातु )
 
ज़ी सिने अवॉर्ड्स :
2003: ज़ी सिने अवॉर्ड बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर (कविता कृष्णमूर्ति के साथ साझा) - डोला रे (देवदास)
2006: ज़ी सिने अवॉर्ड बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर - पियु बोले (परिनीता )
2008: ज़ी सिने अवॉर्ड बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर बरसो रे (गुरु)
 
स्टार स्क्रीन अवॉर्ड्स :
2004: स्टार स्क्रीन अवॉर्ड बेस्ट फिमेल प्लेबैक - जादू है नशा है (जिस्म)
2006: स्टार स्क्रीन अवॉर्ड बेस्ट फिमेल प्लेबैक - पियु बोले (परिनीता)
2008: स्टार स्क्रीन अवॉर्ड बेस्ट फिमेल प्लेबैक - बरसो रे (गुरु)
 
इतर अवॉर्ड्स :
2005: आंध्र प्रदेश स्टेट अवॉर्ड बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर - पिल्लागाली अल्लारी (अथाडू ) और नीके नुवु (मोदाती सिनेमा ) (तेलगु )
2007: तमिलनाडु स्टेट फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल प्लेबैक - मुन्बे वा (सिल्लुनु ओरु काढाल) (तामिल )
2008: अप्सरा अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर - बरसो रे (गुरु)
2009: अप्सरा अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल प्लेबैक सिंगर - तेरी ओर (सिंह इस किंग)
2008: GPBA - जर्मन पब्लिक बॉलीवुड अवॉर्ड बेस्ट सिंगर (फिमेल) - ये इश्क हाय ( जब वी मेट)
2008: ज़ी अस्तित्व अवॉर्ड फॉर एक्सीलेंस इन म्यूजिक
2010: अस्परा अवॉर्ड बेस्ट फीमेल प्लेबैक सिंगर - तुझ में रब दिखता है (रब ने बना दी जोड़ी)

© विशाल इंगळे

संदर्भ :
1) http://en.wikipedia.org/wiki/Shreya_Ghoshal
2) www.shreyaghoshal.com    
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment