Popular Posts

Tuesday, 24 June 2014

मनोगत...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


मनोगत.....

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

नमस्कार मित्रांनो,


  सहसंपादक या नात्याने मनोगत व्यक्त करण्यासाठि मलाच बळिचा बकरा बनवण्यात आलंय.... खरं सांगायच म्हणजे संपादकिय किंवा मनोगत लिहिण्याइतके मोठे आम्हि झालेलो नाहि.... पहिलाच अंक असल्याने मनात फार चुळबुळ चाललीय, आणि भीती वाटतीय ती वेगळीच...... काय लिहावं आणि काय लिहु नये असं झालंय अगदि..... असो "गत"क्षणी मनात आलेलं हे मनोगत.......
 
आज आमच्या "मॅगझिन" चा पहिला अंक प्रकाशित होतोय, आमचं हे पहिलंच ई-बुक, साहित्याच्या नव्या जगातलं पहिलं पाउल..... एकाच वेळेस हजारो वाचकांपर्यंत पोहोचणारं ई-माध्यम आज मोठ्या प्रमाणात साहित्याच्या प्रचारासाठि वापरलं जातंय हि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.....त्यातच खारीचा छोटासा वाटा टाकण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न.....  

नाव काहि हि असलं तरी, हि ई मॅगझिन म्हणजे 'चिल्लर' लोकांची मॅगझिन..... जे मनात, तेच ओठांवर, आणि जे ओठांवर, तेच कागदावर...... तीच जुन्या डायरीतली पाने या ई-मॅगझिन निमित्त लॅमिनेशन साठि पाठवत आहोत, असं समजा हवं तर......  

खरं म्हणजे आम्हि सर्व साहित्याशी खूप दुरचं नातं असणारे...... पण शिस्तीने म्हणा कि नकळत जडलेल्या सवयीमुळे, वाचनाची आवड निर्माण झाली...... लहाणपणापासूनच वाचनाची आवड असणारे बरेच लोक सहवासात लाभले, आणि नकळत तेच संस्कार आमच्यावर हि घडत गेले.....
वाचनामुळे मग विचार आकार घ्यायला लागले...... प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टिंकडे बघण्याचा दृष्टिकोण हळुहळु बदलत गेला...... फुलांचा गंध, काजव्यांचं सौंदर्य, सगळ्या गोष्टि मी अनुभवत नव्हतो तर जगायला लागलो होतो..... हे नविन जग होतं.... अतिशय सुंदर..... पण याबद्दल कुणाला सांगयचं म्हंटला तर,शब्दच सापडे ना.... मग एक सर्वोत्तम पर्याय सापडला, तो म्हणजे कवितांचा...... जसे सुचतील तसे शब्द, आणि तुमच्या भावना.... कवितांची एक विशेषता म्हणजे, शब्दांवर वजन दिल्यापेक्षा भावनांना जास्त महत्त्व दिल्या जातं..... समजणार्र्याना तर समजतीलच......
मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील स्वनिल जोशींचं एक फार सुंदर वाक्य आहे,
"कविता समजायच्याच नसतात
समजायच्या असतात त्या भावना....."
भावना कळल्या कि बस्स.... शब्दांची खिचडी कशी हि असो.....  

महाविद्द्यालयाच्या वार्षिक विशेषांकाकरीता लिहिलेल्या कवितांपासून खर्र्या अर्थाने माझ्या लिखाणास सुरूवात झाली.....
खरं म्हणजे माझी एक हि कविता मी लिहिलेली च नाहि...., कधी हि, कुठे हि सुचलेले शब्द कागदावर उतरवले आहेत फक्त......
महेंद्र कुलकर्णींची एक सुंदर कविता आहे.....
 
"कळले मला कधी ना लिहितो उगाच आहे.....
शब्दांत अर्थ माझ्या दिसतो उगाच आहे......"
 
असंच काहितरी माझ्या सोबतहि घडलं, सहज लिहिलेल्या माझ्या कवितांना काहि जवळच्या मित्रांनी आणि शिक्षकांनी अजून लिहिण्यास उद्द्युक्त करणार्र्या प्रतिक्रिया दिल्या,..... आता वहिची मागची पाने निळी व्हायला लागली.....
प्रत्येक पावलावर आयुष्य आपल्याला काहि न काहि शिकवत असतं, कधी कधी वेदनादायी क्षण हि येतात तर कधी अशे हि क्षण येतात कि ते क्षण कधी जाउच नयेत असं वाटतं...... हे सर्व काहि शब्दांत मांडण्याच्या प्रयत्नांत मी लिहु शकतो असं वाटत असलं तरी माझा स्वतहावर तिळमात्र हि विश्वास नाहि......
  ई-माध्यमाचं हे जग साहित्यात क्रांती घेवून आलं, ई-बुक,ई-वाचनाची एक नविन संकल्पना उदयास आली..... साहित्याच्या या भल्या मोठ्या शहरात एक छोटंसं घर आपलं हि असावं असं वाटायला लागलं...... काहि दिवसांआधी माझा सगळ्यात जिवलग बालमित्र विक्किसोबत मी या मॅगझिन ची संकल्पना मांडली..... आजपर्यंत कधी हि विक्किने माझ्या कोणत्याहि मदतीस नकार दिलेला आठवत नाहि...... त्यामुळे या संकल्पनेबद्दल बोलण्यासाठी त्याच्यापेक्षा योग्य, आणि मुख्य म्हणजे माझ्यासारखीच रिकामी दुसरी व्यक्ती मला सुचलीच नाहि..... त्याने फक्त माझ्या मदतीसाठी हातच पुढे केला नाहि, तर सर्व मुख्य सुत्रे सांभाळण्याची जबाबदारी हि दर्शवली.....
 
या ई-मॅगझिनचा पाया आम्हिच रचल्याने बहुधा आमचाच सहभाग जास्त दिसेल..... पण खरं म्हणजे हे सगळं जुळवणं खूप अवघड होतं...... नविन काहितरी करायचं म्हंटला तर नविन च प्रश्न निर्माण होतात...... नुकती आमची टिम एका जागी आणण्यासाठिच कितीतरी हेलपाटे खावे लागले...... मॅगझिन तयार करण्यास जितका वेळ लागला नाहि, त्यापेक्षा जास्त दिवस फक्त मॅगझिन साठि नाव शोधण्यात गेले......
कळत नकळत अनेक पडद्यामागच्या व्यक्तींची आम्हाला मदत झाली...... ई साहित्यच्या अध्यक्षस्थानी असलेले सुनिल दा, संत गाडगेबाबा अमरावती विद्द्यापीठाचे मुख्य लायब्ररीयन डॉ.मोहन खेरडे, आदरणीय अस्वार गुरुजी ई. अश्या अनेक मान्यवरांनी छोट्या छोट्या गोष्टींतून आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं..... त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहिल.....
फक्त एका शब्दावर स्वताहाच्या पायावर कुर्हाड मारुन घेण्यास, एका पायावर तयार झालेल्या, आणि आपलेपणाने मदतीचा हात पुढे करणार्र्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.....  

या ई-मॅगझिन निमित्त रद्दितल्या धुळ खात पडलेल्या माझ्याच कविता बर्र्याच दिवसांनंतर परत वाचायला मिळाल्या..... परत जगायला मिळाल्या....
या मॅगझिन निमित्त आम्हि सर्व जिवलग मित्र एकत्र आलो..... एका नविन आयुष्याला सुरुवात करत असताना, आम्हि सर्व एकत्र आहोत हि सर्वात आनंदाची गोष्ट......  

ई-साहित्याच्या क्षेत्रातील वाटचालीत हे नुकतंच पहिलं पाउल आहे..... नकळत अनेक चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मी स्वताहून पुर्ण टिम तर्फे माफी मागतो......
 
कविता आवडल्या, लेख आवडलेत, अंक, संकल्पना..... तर आम्हाला नक्कि कळवा..... काहि तक्रार असेल तरी कळवा......
या अंकाला तुमच्या प्रेमाची आणि पुढिल वाटचालीकरीता बहुमोल मार्गदर्शनाची आशा करतो......
 
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment