Popular Posts

Tuesday, 24 June 2014

ग्रामीण तरूणाई मागेच....!

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


“ ग्रामीण तरुणाई मागेच......! ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

तरुणाई म्हणजे जोमाने ओसंडून वाहणारा उत्साह. मात्र, आज ग्रामीण तरुणाई मागे असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागांत असलेली अपुरी सुविधा, याउलट शहरातील तरुणांचा भरपूर विकास झालेला दिसून येतो. सुसज्ज व अद्दयावत महाविद्द्यालये,विविध संस्थामार्फत चालविली जाणारी मार्गदर्शन केंद्रे, विविध शिबिरे; ज्याद्वारे शहरातील तरुण प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करीत आहेत. त्या तुलनेत मात्र ग्रामीण तरुणांची इच्छा असूनसुद्धा योग्य मार्गदर्शनाअभावी ते प्रगती साधू शकत नाहीत. ग्रामीण भागांत बहुतांश तरुणांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शहरात शिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ग्रामीण भागांत रस्ते, वीज, पाणी, रोजगार यांचा तुटवडा वाढतच चाललो आहे. त्यातच वीज भारनियमन आणि इतर समस्यांच्या विळख्यातून मार्गक्रमण करीत आजचा ग्रामीण युवक स्पर्धेच्या युगात टिकेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने शहरी सुखसुविधांप्रमाणे ग्रामीण भागांतसुद्धा अत्याधुनिक सुविधा प्राप्त करुन दिल्या पाहिजेत. तसेच सरकारी व निमसरकारी संस्थानीसुद्धा ग्रामीण भागांत मार्गदर्शनाचे काम केल्यास, ग्रामीण तरुणाईचा विकास होईल आणि ते आपले योगदान देशाच्या सक्षमीकरणामध्ये अवश्य देऊ शकतील.

© वैभव कन्हेरकर    
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment