Popular Posts

Tuesday, 24 June 2014

जय हो...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


जय हो....

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

एक भारतीय सैनिक, जरिहि तो एक सरकारी नौकर असला तरीही त्याची एक वेगळीच ओळख असते.....
त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण,तसेच "सैनिक आहे तो मुलगा" अशी लोकांची भावना,हे सर्व पाहण्याजोगतं असतं.....

मित्रांनो, मी तुम्हाला आता माझ्या जिवनातील एक अमूल्य घटना सांगणार आहे, आशा करतो की हा लेख वाचल्यावर तुमच्या मनातील भावानासुद्धा जागृत होतील....
मे 20, 2014 रोजी माझ्या जिवलग मित्राच्या बहिणीचे लग्न होते.... ती जरी त्याची सख्खी बहिण असली तरीही भाऊ म्हणून ती मलाच जास्त इज्जत देत होती..... त्याच लग्नात मी आदल्या दिवशी लग्नाची कामे करत असताना,62 किलो चा गंज मला उचलायचा होता.... पण आधीच अंगात जोर नव्हता आणि बहिण आता घर सोडून जाणार म्हणून मनस्थिती सुद्धा ख़राब झालेली होती....मी गंज उचलन्यासाठी मुलांना बोलवायला बाहेर आलो, तेव्हढ्यातच भाऊंचे आगमन झाले.....
सुमारे 60-60 किलो वजनाची दोन मुले,तरुण, धष्टपुष्ट, वय 23 वर्षे, उंची जवळपास 174 सेमी, म्हणजेच साधारणतः 5 फुट 7 इंच..... आणि त्या दोघानीं एकेका हातानेच तो कडी नसलेला गंज पकडून ट्रक्टरवर ठेवला,ते दृश्य बघून माझ्या डोळ्यांतील नसांत रक्त गोठले आणि माझ्या डोक्यात विचारांची खळबळ माजली. ..
सुमारे 10:30 वाजता संगीतमय हळदिच्या कार्यक्रमात ते दोघे नाचत होते. मी त्यांना आजवर कधी पाहिलेच नव्हते... हळदिचा कार्यक्रम संपताच मी माझ्या मित्राला विचारले की ,
"कोण आहेत रे हे दोन महाबली?"
"एक माझ्या मावशीचा मुलगा आहे, आणि दूसरा मोठेबाबांचा... " त्याने थोडक्यात परीचय करून दिला...
मी म्हंटला, "काय काम करतात हे ?"
तर तो म्हणाला, "दोघेही आर्मीत आहेत....."
ते त्याचे उद्गार ऐकून मी समजलो की, सामान्य व्यक्ती तो बिनकड्यांचा गंज उचलुच शकत नव्हते......
दुसर्या दिवशी लग्नात गेलो असता, दोघेही सोबत होते आणि ज्याप्रमाणे लोफर मुले मुलींना पाहतात त्याचप्रमाणे ते सुद्धा लग्नाचा आनंद घेत होते....
मला त्यांच्याशी बोलायचं होतं पण आर्मी वाले म्हणजे खट्ट्याळ डोक्याचे असतील म्हणून मी तेव्हा काहीच बोललो नाही... लग्न झाले असता दोघेही माझ्या बाजूने जेवणासाठी पंगतीत बसले.... तेव्हा मी ठरवलं आता ह्यांना काहीतरी विचारावंच.... .
मी म्हंटलं, "नमस्कार दादा,ऐकलंय की तुम्ही आर्मीत आहात...."
दोघेही,"हो....."
मी,"कुठे आणि ड्यूटी कसली आहे?"
पहिला,"मी जनरल ड्यूटी,आसामला...."
दूसरा,"आणि मी स्पेशल फोर्सेस,दिल्लीला....."
मी, "दादा,भीती नाही वाटत का तुम्हाला.....?"
दोघेही,"कसली भीती रे?"
"आपल्याच देशात कशाला कुणाच्या बापाला घाबरायचं.....?"
तेव्हा माझी आर्मी जॉइन करण्याची इच्छा प्रबळ झाली....
मी,"दादा,मला पण आर्मी जॉइन करायची आहे...."
पहिला,"अरे कर न मग...! चांगली तयारी कर, हालत बनव, उंची वाढव, आर्मीत इज्जत तर भेटतेच भेटते, पैसाही भरपूर आणि कसलं टेंशनही नाही..."
दूसरा, "फक्त लागल्यावर पस्तावू नको,म्हणजे झालं, नाहीतर म्हणशील ह्या दोघांनीच मला फसवलं....."
पहिला, "आणि फक्त ट्रेनिंग व्यवस्थित कम्पलीट करशील.. .!"
तेवढे बोलून जेवण संपले.... मी आनंदाच्या भरात नाव्हून गेलो.... त्या दोघांनी बाहर मला छाती फुगवायला लावली, मी छाती फुगवून दाखवली असता त्यांनी "वेरी गुड" म्हंटलं..... आणि मी आनंदाने भारावून गेलो...
तिसर्या दिवशी ते दोघेही ड्यूटी वर जाण्यासाठी निघाले.... जात असताना आई-वडिलांकडे पाहून त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पाझर माझ्या हृदयात कल्लोळ माजवून गेला..... जाताना माझ्याकडे बघून
"येतो रे नेक्स्ट जनरेशन आर्मी....."
असं म्हणुन, ते मला त्यांचा नंबर देवून निघून गेले...... ते त्यांचे सुमधुर बोल ऐकून माझ्या हृदयातील रक्त डोक्यात गेले आणि भावना जागृत झाल्या.....
आता माझे एकच लक्ष होते, ते म्हणजे आर्मीत भरती व्हायचे..... वडिलांना सांगितले असता त्यांनीही मला प्रोत्साहनच दिले.. .
मित्रांनो,शेवटी एवढंच सांगायचंय की मुलींमागे का फिरता?
प्रेम करायचंच आहे तर देशावर करा,
मुली स्वतः तुमच्या मागे फिरतील....
 
म्हणून भावना जागृत करा आणि
सैनिक बना.....
जय हिंद......
 
© प्रफुल इंगळे    
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment