Popular Posts

Tuesday, 24 June 2014

प्रवासापासून प्रवासापर्यंत...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


प्रवासापासुन प्रवासापर्यंत...

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

माझ्या जिवनातील हा शेगांव प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय प्रसंगच आहे.......

विक्की, मी, आणि राहुल....आम्ही तिघेही अतिशय जिवलग मित्र......! आता इथे जिवलग म्हणजे फक्त नावापुरते नसुन वेळप्रसंगी गरज पडल्यास खरच एकमेकांसाठी जिव दिला असता असे मित्र मला सुदैवाने लाभले.....
दोन दिवसानंतर राहुलचा बर्थडे येणार होता..... विक्की आणि मी गेल्या दोन अडिच महिन्यांपासूनच राहुलसाठि सरप्राईज पार्टि प्लॅन करण्याच्या मागे लागलो होतो...... त्या दोघांनीहि शेगांव कधीच बघितले नसल्यामुळे शेगांव मध्येच बर्थडे पार्टि करण्याचा बेत ठरला.....खरं तर आम्ही तिघेहि सोबत कुठंतरी जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होणार होता..... पण येन वेळेवर राहुलला अर्जंट काम आलं आणि आमच्या दोन अडिच महिण्यांच्या मेहनतीचा बट्याबोळ झाला...... शेवटि मग विक्की आणि मी आम्ही दोघांनीच निघायचं ठरवलं आणि दुसर्र्या दिवशीच्या प्रवासासाठि पुर्वतयारीस सुरुवात केली..... आमच्याच एका मित्राने आम्हाला कुरुम स्टेशन पर्यंत सोडुन दिले..... शनिवार दिवस होता आणि शनिच्या साडेसातीची सुरुवात येथुनच झाली.... मी असं म्हणतोय कारण सर्व कामे अगदि योग्य वेळेवर व्हावीत अशे धडे आम्हाला लहाणपणा पासुनच मिळत असल्याणे आम्हि आधीच अर्धा तास अगोदर स्टेशन वर येउन पोहोचलो होतो......पण सरकारी कामे किती वेळेवर होतात हे तुम्हाला माहित असेलच..... तर रेल्वे एक तास लेट होणार होती...... आता 3 गावे ओलांडुन परत माघारी जावुन येणे शक्य तर नव्हतेच पण ज्या पद्धतीने गावातील सर्व मित्र मंडळीन्नी आमचा निरोप समारंभ पार पाडला होता,विचारु नका....., सांगायचं तात्पर्य एवढंच कि 1आणि अर्धा असा एकुण दिड तास स्टेशन वरची "हिरवळ" बघण्यातच गेला.....
विक्की आणि माझी मैत्री हि आमच्या जन्मापासुनच...... विचारांत फार वेगळेपण असुनहि, आमच्या तिघांच्याहि मैत्रीत कधी काहि फरक पडला नाहि ,उलट चालणार्र्या वेळेसोबत आमच्या मैत्रीची आगगाडी तुफान वेगाने धावतच होती, तिहि वाढत्या वेगाने..... पण आमच्या मैत्री ची एक वेगळीच बात.... विक्की आणि माझं घर अगदि समोरासमोर.... दोघांच्याहि घराला एकच अंगण म्हणा ना..... त्यामुळे आमची मैत्री हि लंगोटि पेक्षाहि जुनी...... मजेशीर बाब म्हणजे माझे काका आणि त्याचे काका हे पण जिवलग लंगोटि यार....त्यांची गावात एक वेगळिच ओळख होती....... ती म्हणजे त्यांची बोलण्याची शैली..... गुप्त सम्भाषणाकरीता ते अक्षरांची आलटापालट करुण बोलत..... उदाहरणार्थ सांगायचं झालंच तर दिक्षाभुमी स मीभुक्षादि किंवा क्षादिमीभु वगैरे...... कधीकधी तर नविन शब्द आणि असणारा शब्द यात काडिचाही सम्बंध नसायचा..... याच्याच जोडिला त्यांच्या बोलण्याच्या प्रचंड वेगामुळे , विषय तर सोडाच पण शब्द हि कोणी पकडु शकत नसे...... त्यांच्या सहवासात असल्याने आम्हाला हि शैली वारश्यातच मिळाली.... पुर्णपने त्यांच्याप्रमाणेच आत्मसात करु शकलो नसलो तरी आम्ही त्यातच थोडंस संशोधन करुन आम्हि आमची स्वतहाची अशी वेगळिच संभाषण शैली निर्माण केली होती.....
असो, तर एकदाची आमची भुसावळ एक्सप्रेस प्लॅट्फोर्म वर येउन थांबली आणि मित्राचा निरोप घेउन आमच्या टवाळक्यान्ना सुरुवात झाली...... शेगाव च्या गजानन महाराजांबद्दल आस्था असनार्र्या भाविक भक्तांसोबतच , सुट्ट्या एंजोय करण्यासाठि मित्र-मैत्रिन्नीसोबत फिरायला येनार्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थीन्नींच्या घोळक्याने डबा अगदि गच्च भरला होता..... शेवटि रेल्वे च्या दारात उभं राहुनच शेगावपर्यंत प्रवास करावा लागला..... आमच्या टवाळक्या यादरम्यान सुरुच होत्या म्हनुन शेगाव कधी आलं हे कळलंच नाहि.....
माझ्यासाठि शेगांव तसं काहि नविन नव्हतं पण विक्की ची शेगांव भ्रमणाची पहिलीच वेळ असल्याने आणि शेगांव बद्दल बरच काहि एकलेलं असल्याने एक विशेष आकर्षण होतं ..... भाविक भक्तांसाठि दोन वेळचं जेवण मोफत असतं असं आम्हि ऐकुण होतो.... म्हणुन खिशात फारसे पैसे नसुनहि विशेष असं काहि टेंशन नव्हता...... 3-4तासांच्या प्रवासामुळे पोटात कावळ्यांची कावकाव सुरु झाली होतीच..... आणि दर्शनाच्या रांगेत बराच वेळ उभं राहल्याने भुख अजुनच वाढली होती...... दर्शन झाल्यावर आम्हि लगेच भोजनकक्षाकडे मोर्चा वळवला.... पण आमचा निघन्याचा तो मुहुर्त कुठला कोण जाणे ,महाप्रसादाची वेळ सम्पली होती.....अश्या रितीने आमचा मिट्ठु पडला आणि आमच्या आनंदाला चंद्रग्रहन लागले..... खिशात पैशे आधीच कमी होते , आणि अजुन पैशांची निकड कुठे भासेल याची हि पुर्वकल्पना नसल्याने फक्त एक प्लेट पुरिभाजी ओर्डर करुन,भेट्लेल्या फक्त 8 पुर्या , कथेतील आपल्या भावावर अत्यंत प्रेम कर्नर्र्या बहिणीने मिळालेल्या एकाच तिळाचे 5 सम भाग करुन वाटुन द्यावे.... तश्या चार चार पुर्र्या वाटुन घेतल्या......
पोट भरलं नसलं तरी हि उजव्या खिशातिल 75% उरलेले पैसे आणि डाव्या बाजुचा फाट्लेला खिसा बघुन ,चला मस्त जेवन होतं, पोट भरुन जेवण झालं ., अशी स्वतहालाच आणि एकमेकान्ना खोटि सांत्वना देउन शेगांव भ्रमंतिस सुरुवात केली...... अर्थात संध्याकाळी तरी पोट भरुन जेवण मिळेल आणि ते हि मोफत..... अशी थोडिशी आशा होतीच..... सद्ध्याच अर्थशास्त्र हे आमच्या संख्याशास्त्रात बसण्यासारख नसल्याने ,सम्पुर्ण शेगांव आम्हि पायाखाली च तुडवले.... संध्याकाळी मात्र पायाला चालुन चालुन आलेल्या फोडान्नी शरीर शास्त्राची पुर्णपणे ओळख करुन दिली...... रात्रीच्या जेवनासाठि भोजनकक्षेकडे वळल्यावर फक्त एकाच वेळेस मोफत जेवन उपलब्ध होतं हे माहिती पडल्यावर मात्र दिवस पौर्णिमेचा नसुन अमावस्या असल्यासारखा भासायला लागला.... आणि घरुन निघताना नक्किच काळि मांजर आडवि गेली असेल असं वाटायला लागलं...... असो थोडासा खिसा अजुन हलका करुन आम्हि भोजनकक्षेकडे प्रस्थान केले....... पाच सहा वर्षांत येथे अमुलाग्र बदल झाला होता...... भक्तांच्या देवावर होणार्र्या क्रुपेचा तो फरक..... भाविक भक्तांची अपार आस्था त्यान्ना या पवित्र ठिकाणी ओढुन आणते..... आणि आपल्याला जमेल त्या पद्धतीने खुल्या हातान्नी भाविकगण दान करत असतात.... मुख्य म्हणजे ठरलेल्या रकमेपेक्षा एक दमडि पन येथे जास्त घेतल्या जात नाहि..... याबद्दल आमच्या सोबत घडलेला एक मजेशीर प्रसंग म्हणजे बॅग ठेवन्यासाठि लाॅकर अरेंज करताना दोन रुपये सुटे नाहित म्हणुन आम्हाला 30-35 मिनिटे वाट बघावी लागली..... उलट आम्हि सुटे नसेल तर परत न करता वरचे तीन रुपये स्वतहाकडे च ठेवा अस पण म्हनुन बघितलं होतं पण नियमाप्रमाने त्यान्नी एक रुपया हि जास्त घेतला नाहि..... शेवटि गरज नसतानाहि बाहेरच्या दुकानातुन तीन रुपये खर्च करुन पैसे सुटे केले आणि लाॅकर घेतला...... भोजनकक्षेतील कर्मचार्र्यांबद्दल हि असाच काहि अनुभव आला...... एका वयोवृद्ध व्यक्तिसोबत कर्मचार्यान्ना उद्धट वागताना पाहुन फार वाइट वाटले ,मुख्य म्हणजे दोघांच्या वयात अंतर बघता कर्मचार्र्याच्या वडिलांच्या आणि त्या व्यक्तिंच्या वयात जास्त अंतर असल्यासार्खे जानवत नव्हते..... असो अपना काम बनता तो भाड मे जाये जनता, या उक्तीप्रमाणे..... आम्हि मुकाट्याने जेवण करुन बाहेर पड्लो, दाराजवळ ठेवलेल्या तक्रार पेटित मात्र येथील व्यवस्थेबाबत EMS बरोबर आहे पण EMS बरोबर नाहि म्हणजे ईटिंग मॅनेजमेंट सिस्टिम बरोबर आहे पण एम्प्लोयी मॅनेजमेंट सिस्टिम बरोबर नाहि अशी प्रतिक्रिया टाकुन काढ्ता पाय घेतला..... जेवनावद्दल बोलायचा झालं तर ,इतका झक्कास जेवन गेल्या कित्येक दिवसांत झाला नव्हतं....
आम्हि अट्टल बेवडे नसलो तरीहि , मित्रांसोबत बर्थडे पार्टि , 3st वगैरे बियर वगैरे घेत असु..... दुसर्र्या दिवशीच जेवन वगैरे आणि घरी परत जाणे होइल याची पुर्ण खात्री करुन तेवढे पैसे सोडुन बाकिचे पैसे वेगळे काढुन घेतले ,जेमतेम 60 रुपये होते..... एवढ्या पैश्यांत बियर तर साहजिकच शक्य नव्हती.... मग बराच वेळ वादविवाद झाल्यानंतर देशी दारु ची एक बाॅटल घेतली..... आम्हि दोघं हि देशी फर्स्ट टाइम च घेणार होतो..... पण देशी दारु च्या फक्त वासानेच विक्किला उलट्या झाल्या...... दिवसभरातील खाण्यापिण्यात गेलेले सर्व पैसे साहजिकच वाया गेले होते..... आता वडिलांची मेहनतीची कमाई वाया जाऊ नये म्हणुन पुर्ण बाॅटल नाईलाजास्तव मला एकट्यालाच गटकावी लागली.....
थोडा वेळ अजुन शेगांव भ्रमंती करुन आम्हि मंदिराकडे परतीस निघालो..... आम्हि बराच वेळ जिथे घालविला होता....त्या भक्तिसंकुलासमोर आम्हि येउन बसलो...... चार-पाच वर्षांआधी मी मित्रासोबत येथे आलो होतो तेव्हा मोबाईल चार्जिंग चा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता...... कुठेच शोधुनहि प्लग मिळत नव्हता..... असं च फिरता फिरता मग हि जागा दिसली होती..... असो आमचा कॅमेरा चार्ज करण्यासाठि लावुन आम्हि.... आसपासच्या परिसराच निरिक्षण करत होतो....... संख्याशास्त्राचे विद्यार्थी असल्यामुळे आमच्यात स्वभावताच हा गुण निर्माण झाला होता..... काहि वाचकांसाठि हे आक्षेपार्ह असु शकत पण एका मुलीला बघुन आम्हि दोघं पण अगदि शाॅक झालो..... आई शप्पथ जिवनात अशी मुलगी कधी बघितली नसेल.... पण नशीबाने इथेहि साथ दिली नाही.... .. आणि तिच्या गल्यातल मंगलसुत्र बघुन......., जाउ द्या..... एकदाचा कॅमेरा चार्ज झाला आणि आम्हि मंदिरात परतलो.... पैशांच अंकगणित बघता एक च गादि घेउन अड्जस्ट करुन आम्हि कसं तरि झोपलो....
रात्री आम्हि फार उशिराच झोपलो होतो... पण येथील सफाई कामगारान्नी निट झोप हि घेउ दिली नाहि ,अर्धनिद्र अवस्थेत गादि परत करुन आम्हि मंदिराच्या बाहेर पड्लो..... टपरिवरच्या चहावाल्याने च आम्हाला दंतमंजन औफर केल..... कमीत कमी हे तरी आम्हाला नक्किच एक्स्पेक्ट नव्हत..... त्याच टपरी वरच्या अप्रतिम चहाचा आस्वाद घेत आम्हि त्या सुखद आणि रम्य सकाळ चा आनंद घेत होतो.....
कालपासुन आजपर्यंत आम्हि एवढ्या टवाळक्या केल्या होत्या कि आमची गुप्त सम्भाषण शैली नसती तर आमचं राम नाम सत्य नक्किच होतं.....
आम्हि प्रत्येक शब्दामागे उगिचंच काम नसतानाहि MS जोडत असु.... उदाहरनार्थ सांगायचा झाल च तर , चहा साठि TMS, बस साठि STMS ,वगैरे...... बर्याच वाचकांस अजुनहि काहि कळले नसेल तर , टेंशन घेऊ नका कारण कळु नये म्हनुन च तर ऐवढा खटाटोप.... नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्व दुकाने फिरुन आम्हि काहि नविन विशेष अस काहि शोधन्याच्या बेतात होतो.... एक लाॅकेट आम्हाला दोघान्नाहि फार आवडले होते.... पन त्या 1रुपयाच्या नान्यापेक्षाहि अर्ध्या साईजच्या लोकेट्ची किम्मत आमच्या खिश्यातल्या पैशांपेक्षा हि दुप्पट होती.... पुढच्या वेळेस आल्यावर आपण नक्कि खरेदि करु अस ठरवुन आम्हि दुकानातुन बाहेर पड्लो.... बॅग्स वगैरे घेउन आम्हि एका गाडिवर नाश्ता केला आणि आनंद सागर साठि बस स्थानकाकडे निघालो.... भाविक भक्तांसाठि आनंद सागर पर्यंत मोफत बस सुविधा असल्याचे कळल्यावर तर आमच्या आनंदाला पारावार च उरला नाहि..... पण इथेहि एक प्रोब्लेम होता च , रांगेत उभा राहन्याचा..... आमच्या समोर उभी असलेली एक सुंदर मुलगी आमच्या टाईमपास चा तात्पुरता विषय बनली.... आमच्या गोश्टी चालु असतानाच आमच्या मागे असलेल्या एका सद्ग्रुहस्थाने तुम्हि MBBS ला आहात का असा अनपेक्षित प्रश्न केल्यावर आम्हाला हसु आवरेनास झाल..... शेवटि फक्त 'नाहि' एवढच बोलुन आम्हि त्या सद्ग्रुहस्थास फुग्ग्यात घेतले..... आणि पुन्हा आमच्या गोश्टिंस सुरुवात केली.....  

शेगांव मध्ये काहि बघण्यासारखे असेल तर आनंद सागर..... येथील झुलत्या पुलाबद्दल आम्हाला अतिशय चढवुन सांगन्यात आले होते..... पण झुलत्या पुलाने आम्हाला पुरते झुलवुन टाकले..... विक्किच्या मोठ्या अधिकार्र्याचा त्याला फोन आला , दोन दिवसानंतरची त्याची मिटिंग आता उद्याच होणार होती..... म्हणजे आता परतीसाठि आम्हाला निदान 4-5 तास आधीच निघायला लागणार होते...... येथे फिरताना आमच्या वयापेक्षाहि अर्ध्या वयाच्या मुलीबरोबर चाळे करनार्र्या आमच्या पेक्षाहि दुप्पट वयाच्या ईसमास बघुन माणसाच्या विक्रुत बाजुचीहि जाणिव झाली...... जेवढ्या लवकर शक्य होइल तेवढ्या लवकर पुर्ण आनंद सागर पालथे घालुन आम्हि जेवनाची आॅर्डर दिली..... पोट भरुन जेवन झाले खरे पण मला हे जेवन पचलेच नाहि...... आम्हि दोघं जेवननंतर एका झाडाच्या आडोश्याला विश्रांती घेत होतो..... अचानक पोटात कळा यायला लागल्या...... तेवढ्यात माझ्या स्थानिक मैत्रिणीचा मला काॅल आला..... या दोनहि गडबडित मी कसे तरी प्रसाधन ग्रुह शोधुन लगबगिने आत घुसलो..... मध्येच मला बाहेर काहि स्त्रियांचा आवाज ऐकु आला..... पुरुषप्रसाधनग्रुहातील अनपेक्षित आवाजाने मला काहितरी चुकचुकल्या सारखे वाटले......पण त्या कदाचित तेथील सफाई कर्मचारी असतील अशी मी स्वतहाची समजुत घालुन घेतली..... नंतर थोडा फ्रेश होवुन मी बाहेर पडलो..... विक्किने मला त्याच्याकडे येताना पाहल्यावर तो जोरजोरात हसायला लागला...... मी त्याच्या अगदि जवळ जाईपर्यंत तो हसता हसता जवळजवळ जमीनिवर च लोळायला लागला होता..... घामाने ओलाचिम्ब झालेल्या अवस्थेत त्याला असे हसताना बघुन मला काहिच कळत नव्हते..... बराच वेळ गेल्यानंतर कसतरी स्वतहाला सावरत त्याने मला प्रश्न केला कि , " तु कुठे गेला होतास......? " मी त्याला प्रसाधन ग्रुहाकडे इशारा करुन काहि सांगायच्या आधीच भिंतीवर्च्या वरच्या स्त्री चित्राकडे आणि खाली लिहिलेल्या स्त्री प्रसाधन ग्रुहाने माझे लक्ष आकर्षित केले ,आणि विक्किने पुन्हा जमिनीवर लोटांगन घालायला सुरुवात केली.... आता घामाने अंघोळ करायची वेळ माझी होती...... स्त्री आनि पुरुष प्रसाधनग्रुह अगदि जवळजवळ असल्याने आणि मोबाईल च्या गडबडित मी चुकुन...... आणि मघाशी येनार्या स्त्री प्रसाधन ग्रुहातील आवाजाच रहस्य आता चांगलच उलगडलं होतं ...... मी गेलो होतो तेव्हा विक्कि अर्धनिद्रेत होता..... मी बराच वेळ आलो नाहि हे बघुन त्याने माझा शोध घ्यायला सुरुवात केली होती, पण बॅटरी संपल्याने तो मला काॅल करु शकत नव्हता..... या दरम्यान त्याला पण अशीच गफलत झाल्याची शंका हि आली होती.... पण मग मी कदाचित माझ्या मैत्रिनीला भेटायला गेलो असेल असा समज करुन तो वाट बघत बसला...... दरम्यान त्याने आसपास चा पुर्ण परिसर शोधुन काढला होताच.....
मी स्त्री प्रसाधनग्रुहात प्रवेश करेपर्यंत आणि तेथुन बाहेर येईपर्यंत दुरदुरपर्यंत कुठेहि विक्किला सोडुन कुणीच नव्हतं, हिच गजानन महाराजांची कृपा..... हसताहसताच आम्हि तेथुन त्वरीत पळ काढला..... जर कुणी चुकुन मला आत बघितलं असतं तर आयुष्य भराची अद्द्ल घडली असती......
त्या दिवसानंतर तर मी स्वताहाच्या नावाची पाटि हि 7-8 वेळा "अति-निरिक्षण" करुन बघितल्याशिवाय स्वताहाच्याच घरातहि प्रवेश करत नाहि.....

© विशाल इंगळे  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment