Popular Posts

Tuesday, 24 June 2014

संपादकीय लेखणीतून.....

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


संपादकीय लेखणीतून.....

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

संपादक असल्यामुळे संपादकीय लिहावं लागलंच.... संपादकीय लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे आणि तशी कधी गरज हि न पडल्यामुळे या बद्दल काही माहितीच नव्हतं....मनापासून मनापर्यंतच्या पहिल्या अंकानिमित्त का होईना, अनेक संपादकीय लेख वाचनात आले... या अंकामुळे मी अनेक पुस्तकांतील, वर्तमानपत्रातील, वेगवेगळ्या मासिकांतील; इतकेच नव्हे तर काही दिवाळी अंकातील संपादकीय सुद्धा चाळुन बघितले.... मी जेमतेम वयाच्या 19 व्या वर्षी ओठातले शब्द वहिच्या पानावर उतरवण्यास सुरुवात केली , म्हणजे कविता करण्याची सुरुवात झाली. तसा मी बि.एससी. मॅथ्स चा विद्यार्थी असल्यामुळे साहित्याशी काही संपर्कच नव्हता , पण वाचनाची आवड असल्यामळे ,
"शब्दाची सांगळ
जुळवण्याचा प्रयत्न केला ,
अखेर कवितेचे कोडे उलथे पडले
आणि
मनातिल भावनांचे वारे
सैरा वैरा पडत सुटले ."
गणिते करता करता कविता कशा सुचल्या हे तर कळेनासे झाले .......
कवितेची लागलेली नशा पाहुन
मॅगझिन चा विचार
विशाल च्या डोळ्यासमोर येउन
माझ्या ह्रुदयात बसला....... कारण........ " बेभान मनाला लागलेलं, वेड
हे कवितेच्या प्रेमात हरपुन गेलं,
वहिमधलं, पान कोरुन
इंटरनेटच्या जगामध्ये आलं."........
ह्या अंकाबद्द्ल सांगायचं झालं तर हा अंक
फक्त मनातिल भावना,
ओठांवरील शब्द इतकाच आहे.

मनापासून मनापर्यंत..... आमच्या अंकाचं शिर्षक.....! अंकाबद्दल बोलायचं झालं तर, या अंकात.सर्वकाही मनापासूनच आहे; फक्त ते आपल्या मनापर्यंत.पोहोचविले इतकेच.....
नविन काहि करायचं म्हंटलं, तर.अडचणी निर्माण होतातच..... तश्या आमच्या कामातही त्या फरकटत होत्याच.... पुरेसं भांडवल नसल्यामुळे अनेकांची मदत घ्यावी लागली.....कुठे कुठे तर आमची टिंगलही होत होती..... ती होणं ही साहजिकच होतं.... कारण आतापर्यंत चिल्लरपणा आणि रिकाम्या कामांशिवाय आम्ही काहि केलंच नाही.....
अंकाचे काम चालु केले तेव्हापासून प्रत्येक पहाट, आमच्या अंकाला नवी वाट देत होती...... नवनविन कल्पना आम्हाला मिळत होत्या; प्रतिष्ठीत व्यक्तींचे मार्गदर्शनामुळे प्रेरित होउन
अंगात नवरक्त असल्याचा भास
अंक पुर्ण करण्याची आस लागली.....

अचानकच ही विशालची संकल्पना इतकी जोमाने कार्य करेल याचा आम्ही दोघांनीही कधी विचार केला नव्हता...या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी आधार देणारी टिम, आमच्यासारखेच आमच्यासोबत या अंकामध्ये मिसळू लागले व नवनविन कल्पनेच्या ज्योती पेटवू लागले...... अखेर आज मनापासून मनापर्यंत चा.पहिला अंक आपल्यासमोर आला...... हा अंक आपल्यासमोर सादर करताना अवर्णनीय आनंद होत आहे. अखेर आमच्या गुदमरलेल्या भावना मोकळ्या हवेत फिरताहेत अशी जाणिव मनाला होत आहे.

© विपुल वर्धे...
( संपादक....)

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment