Popular Posts

Tuesday, 24 June 2014

मृगजळ - एक समीक्षा

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


मृगजळ - एक समीक्षा

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

पुस्तक : मृगजळ
लेखक : सुनिल डोईफोडे
प्रकार : कादंबरी
संकेतस्थळ : www.marathinovels.net

मृगजळ म्हंटलं कि सर्वात आधी तुमच्या नजरेसमोर काय येतं? वाळवंटात दूर कुठे तरी पाणी असल्याचा होणारा भास, कि दुर समुद्रात चारही दिशांनी फक्त पाणीच पाणी असलेल्या बेटावर अडकल्यावर होणारा बोटिचा भास......? सांगायचं असं मृगजळ म्हणजे नसलेल्या गोष्टिंचं अस्तित्व.....
मृगजळ म्हंटलं कि माझ्या नजरेसमोर येते ती सुनिल डोईफोडेंची मृगजळ..... कुटुंब, मैत्री, प्रेम अश्या सर्वच नात्यांना एका सुत्रात गुंफणारी कादंबरी..... सुनिल डोईफोडेंनी ज्या अप्रतमरीत्या कादंबरीचं लिखाण केलं आहे त्याबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतील..... एक वेळा तुम्हि वाचायला सुरुवात केली कि ती पुर्ण वाचुन होईपर्यंत मनाला चैनच पडत नाहि..... कादंबरी तुम्हाला अस्वस्थ करत राहते..... शब्दरचना, आणि परिस्थितीचं समर्पकरीत्या केलेलं वर्णन; कादंबरीचं प्रत्येक पात्र आणि परिस्थितीचं चित्र तुमच्या नजरेसमोर निर्माण करते..... मृगजळ एक सायकोलाॅजिकल थ्रिलर कादंबरी आहे..... सत्य घटनेवर आधारीत..... पुर्ण कादंबरी वाचली कि "समटाईम्स रियालिटी इझ मोअर ड्रामाटिक दॅन फिक्शन" ही टॅगलाइन सार्थक झाल्यासारखी वाटायला लागते.....

कादंबरी मुळ मराठित असली तरी, गिरिष खत्री आणि मुग्धा आपटे यांनी ईंग्लिश मध्ये अनुवादित केलेली "illusion" तुम्हि वाचू शकता, या शिवाय हिंदीतही हि कादंबरी अनुवादित झालेली आहे...... मुख्य म्हणजे तुम्ही अॅन्ड्राॅईड अॅप म्हणून सुद्धा कादंबरी डाऊनलोड करुन वाचू शकता.....

म्रुगजळ हि सत्य घटनेवर आधारलेली एका कुटुंबाची न संपणार्या रहस्याची कथा......
कादंबरी केंद्रित आहे ती म्हणजे मुख्य पात्र असणार्या विजय वर.... जो शेवटी हॅलोसीनेशन या मानसिक आजाराला बळी पडतो...... तो नशीब आणि परिस्थितीला झुंज देत राहतो.....
हि कादंबरी आहे दैवाच्या हातातील खेळणं झालेल्या पात्रांची.....

कादंबरीची सुरुवात होते राकेशच्या रिसेप्शन पार्टी पासून..... सर्वच मित्रमंडळी रीयुनियन पार्टी असल्याप्रमाणे पार्टीचा आनंद घेत असतात...... सर्व वाट बघत होते ती म्हणजे राकेशचे जिवलग मित्र असणार्या विजय आणि प्रियाची....... प्रियाचं आगमन आधी होतं, ती विजयला भेटायला आतूर असते..... नंतर आई आणि मोठ्या बहिणीसोबत विजय प्रवेश करतो..... आणि सर्व प्रिया वर कमेंट करायला सुरुवात करतात...... सर्वाना वाटायचं विजय आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात असावेत...... विजयला पण प्रियाला काहितरी सांगायचे होते.... प्रिया तिच्या मैत्रिणीसोबत असते तर तो पण आपल्या मित्रांच्या घोळक्यात अडकलेला असतो..... पण संधी साधून आणि मित्रांच्या नजरा चुकवून विजय प्रियाला एकटे गाठतोच..... ते दोघेही खुप दिवसांनंतर समोरा समोर भेटत असतात....... काहितरी महत्वाचं सांगायचंय म्हणून तो प्रियाला दुसर्या दिवशी भेटायला बोलावतो.... त्याच्या आवाजातून त्याची उत्सुकता व्यक्त होत होती..... सर्व पार्टीचा आनंद घेत असताना अचानक झालेल्या शालीनीच्या किंकाळीने वातावरण बदलते..... विजयची बहिण शालीनी हि मानसिक आजाराची शिकार असते..... तिच्या या आजारामुळे विजयचं पुर्ण कुटुंब चिंतित असतं..... दिवसेंदिवस आजार वाढतच जात असतो..... आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने विजयचे वडिल चांगल्या डाॅक्टर कडुन औषधोपचार करवून घेवू शकत नव्हते, आणि या चिंतेने ते नशेच्या आहारी गेले होते...... आता विजय हाच त्यांच्या कुटुंबाची शेवटची आशा असतो...... विजयची मानसिक परिस्थिती व्यक्त करण्यासाठी लेखकाने केलेली शब्दरचना उल्लेखणीय आहे...... या अनपेक्षित घटनेमुळे पार्टी येथेच संपते.......
नंतरचा दिवस प्रियाच्या आयुष्यातला बेस्ट दिवस ठरणार होता...... एवढ्या कालावधीनंतर शेवटी आज तो नक्की तिला प्रोपोज करेल ,अश्या स्वप्नांच्या जाळ्यात प्रिया अडकली होती.... आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीकडुन ते महत्वाचे तीन शब्द एकण्याकरीता, वेळेच्या 1 तास आधीच ती अशोक पार्क मध्ये येते..... आज तिचं स्वप्न सत्यात उतरणार होतं...... विजय येतो, पण नयना बद्दल आपल्या प्रेमाची कबुली दिल्यावर प्रियाच्या स्वप्नांचं घरटं वाहुन जातं...... तो नयना च्या प्रेमात पडतो.....नयना त्याच्या बास ची मुलगी असते आणि त्याची मदतनीस पण...... त्याच्या शब्दांतून त्याच्या नयनाबद्दलच्या प्रेमाची जाणीव ती करु शकत होती..... ती हे सत्य स्विकारते...... आणि विजयपासून शक्य तेवढ्या दुरच राहण्याचा प्रयत्न करते.... कादंबरी तुम्हाला भुतकाळात घेउन जाते...... विजय ,प्रिया आणि राकेशच्या महाविद्द्यालयीन दिवसांत....... विजय आणि राकेश खुप चांगले मित्र असतात आणि प्रिया त्यांच्या महाविद्द्यालयात प्रवेश घेते..... हळुहळु ते चांगले मित्र बनतात, त्यांची मैत्री फुलायला लागते...... विजय आणि राकेशच्या घरची परिस्थिती अभ्यासासाठि अनुकूल नसल्यामुळे ते तिघे प्रियाच्या घरी ग्रुप स्टडी करत..... विजय आणि प्रिया अभ्यासात खुप हुशार असतात पण राकेश तितकासा हुशार नसतो...... HSC चा रिसल्ट तिघांच्या मैत्रीत दुरावा घेउन येतो..... निकाल कमी लागल्यामुळे राकेश प्रिया आणि विजयला दुर्लक्षित करायला लागतो...... विजय अभियांत्रिकी महाविद्द्यालयात प्रवेश घेतो तर प्रिया वैद्द्यकीय...... पण या अंतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत नाही...... थोड्या प्रमाणात का असो पण ते एकमेकांच्या टच मध्ये राहतात....... HSC च्या रिसल्ट मुळे राकेश आणि विजय मध्ये मात्र थोडा दुरावा निर्माण होतो, पण नंतर लवकरच त्यांच्यातील गैरसमज दुर होतो..... नयनाबद्दल माहित पडल्यावर प्रिया विजय पासून दुर राहण्याचा प्रयत्न करते...... विजयच्या आधी आपलं प्रेम व्यक्त न करण्याचं ती ठरवते..... पण दैवाला काही वेगळंच मान्य असतं...... प्रियाला विजयला नोकरीवरुन काढुन टाकल्याची बातमी कळते, आणि ती त्याला भेटायला जाते...... विजय कडुन तिला कळतं कि तो आॅफिसच्या पार्टीत सर्वांसमोर नयनाबद्दलच्या प्रेमाची कबुली देतो आणि दुसर्याच दिवशी त्याच्या हातात टर्मिनेशन लेटर येतं..... प्रिया थोडी गोंधळते, तिला सर्व सत्य स्पष्टपणे जाणून घ्यायचं असतं...... ती नयनाला भेटते आणि तिची बाजू ऐकूण घेते..... नयना सांत्वनापुर्वक आपलं विजयवर कधी ही प्रेम नसल्याचं स्पष्ट करते.......
येथून कथा वळण घेते, विजय पण आपल्या बहिणीसारखाच हॅलोसीनेशन आजाराचा बळी झालाय हे प्रियाच्या लक्षात येतं...... विजयचा मानसिक आजार दिवसेंदिवस वाढतच असतो, सोबतच तो चिडचिडा व्हायला लागतो..... प्रिया आणि राकेश त्याच्या आईला ट्रिटमेंट साठि तयार करायला लावतात.... ट्रिटमेंट मुळे विजय बरा व्हायला लागतो....... प्रिया मुळे त्याला नविन जाॅब मिळतो...... आणि त्यानिमित्तच 15 दिवसांकरीता बाहेर जाण्याची संधीही मिळते...... काहि ठरलेल्या कामांमुळे प्रिया विजयच्या सोबत जाऊ शकत नाही....... विजय परत आल्यावर त्याला घरात नयना दिसते, तो तिच्यावर ओरडतो..... पण नयना तिथे नसतेच..... त्याला कसंतरी शांत करुन त्याची आई त्याला ट्रिप बद्दल विचारते...... '' मी गेल्यावर .. दोन दिवसाने मागून प्रिया तिथे आली म्हणून बरं झालं... नाहीतर खुप बोअर झालं असतं'' विजय उत्तर देतो...... आणि विजयच्या आईला धक्काच बसला...... कारण विजयच्या जाण्यानंतर दुसर्याच दिवशी प्रियाचा अक्सीडेंट झालेला असतो...... आणि तेव्हापासून ती कोमात असते..... त्याला हे सत्य पटावं म्हणून त्याची आई त्याला प्रियाच्या घरी नेते.... विजयचं औषधांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तो पुन्हा मानसिक आजाराचा शिकार होत होता...... या सर्व घटनांक्रमात होणारी त्याच्या आईची मानसिक अवस्था अतिशय दयनीय आहे...... पण तिची सहनशक्ती आणि विजयबद्दलचं असणार्या प्रेमापोटी ती खचून जात नाही..... ती तो पुन्हा बरा व्हावा म्हणून प्रयत्न करते..... विजयला कळतं की प्रिया चांगली व्हावी म्हणून तिला आजीच्या गावी पाठवण्यात आलं आहे...... विजय तिथे जाण्याचं ठरवतो...... त्याच्या आईची ईच्छा असूनही घरच्या जबाबदार्यांमुळे ती त्याच्यासोबत जाऊ शकत नाही..... 4 दिवस होऊनही विजय परत आलेला नसतो, शेवटी त्याच्या कुटुंबाला त्याची डेडबाॅडी मिळते..... विजयच्या मृत्युनंतर प्रिया वडिलांचं घर सोडून देते आणि विजयच्या कुटुंबासोबत राहायला लागते..... ती शेवटच्या श्वासापर्यंत विजयच्या कुटुंबाचा सांभाळ करायची जबाबदारी स्विकारते......
पण स्टोरी इथेच संपत नाही, प्रिया पण आता मानसिक आजाराची शिकार व्हायला लागली होती...... तिला विजयच्या परत येण्याचा भास होतो..... पण प्रत्यक्षात मात्र तिथे कोणीच नसतं..... विजयची आई प्रियाच्या मागे घराबाहेर पडते, जमीनीवर तिला दोन सावल्या पडलेल्या दिसतात, एक प्रियाची आणि एक विजयची...... पण प्रत्यक्षात मात्र तिथे तिनच सावल्या असतात, एक प्रियाची,एक विजयच्या आईची आणि एक त्याच्या बहिणीची......
 
अतिशय सुंदरपणे लेखकाने प्रत्येक परिस्थिती वाचकांसमोर आणली आहे...... पहिल्यांदा वाचताना माझ्या डोळ्यांत पाणी आलं होतं..... शेक्सपिअरचा वारसा लाभलेल्या सुनिल डोईफोडेंचं लेखण अवर्णनीय आहे.....
तुम्ही पण ही कादंबरी मोफत वाचू शकता....... www.marathinovels.net या संकेतस्थळावर......

© विशाल इंगळे

संदर्भ :
1) www.the-criterion.com
2) www.marathinovels.net  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment