Popular Posts

Tuesday, 24 June 2014

जून आणि साहित्य

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


जून आणि साहित्य

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

  मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही. लिहिण्यासारखं खूप आहे. काही काही प्रसंग तर इतके नाट्यपुर्ण आहेत की त्या प्रसंगासाठी काहीतरी आत्मनिवेदनपर लिहावं, पण तरीही, आत्मचरित्र वगैरे काही खरं नाहि. आत्मचरित्र का लिहिलं जात असावं? आपण किती बेस्ट आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाहि, हा टाहो फोडण्यासाठी आत्मचरीत्र लिहिलं जातं. आपल्याला काय काय सहन करावं लागलं हे सांगण्याचाही हेतु असतोच. माझ्या हातून कळत-नकळत असंच काहितरी लिहिलं जाईल. म्हणून आत्मचरित्र नहिं मंगता है! आपण ज्याप्रमाणे काहि लोकांचे अपराध पोटात घालतो, त्याप्रमाणे आपले अनेक अपराध इतर मंडळी पोटात घालत असतात. त्या इतरांनी चरित्र लिहायचं ठरवलं तर आपले तीन तेरा वाजतील. म्हणूनच जोपर्यंत इतर मंडळी आपापली आत्मचरित्र लिहित नाहीत, तोपर्यंत मी माझं आत्मचरित्र का लिहावं?

- व.पु.काळे ( वपुर्झा )
मृत्यु - 26 जुन, 2001


जुन आणि साहित्य :

जुन 1
मृत्यु
१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , नाटककार आणि विनोदी लेखक .
१९९८ - गो.नी. दांडेकर , मराठी कादंबरीकार

जुन 2
जन्म
१९०७ - विष्णू विनायक बोकील , मराठी नाटककार, लेखक .

जुन 4
मृत्यु
१९१८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक

जुन 5
मृत्यु
१९८७ - ग. ह. खरे , भारतीय इतिहासतज्ञ.

जुन 6
जन्म
१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार
१९०९ - गणेश रंगो भिडे , अभिनव मराठी ज्ञानकोशकार
मृत्यु
२००२ - शांता शेळके , मराठी कवियत्री.

जुन 7
मृत्यु
१९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक

जुन 11
मृत्यू
१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेता आणि स्वातंत्र्य सैनिक

जुन12
जन्म
१८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद; बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक.
मृत्यू
१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक.
१९७८ - गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
२००० - पु. ल. देशपांडे , मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.
२००१ - शकुंतला बोरगावकर , विनोदी लेखिका

जुन13
मृत्यू
१९६९ - प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक , पत्रकार, संपादक, राजकारणी, शिक्षणतज्ञ, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक व प्रभावी वक्ते.

जुन 15
जन्म
१९३३ - सरोजिनी वैद्य , मराठी लेखिका, समीक्षिका.

जुन 17
मृत्यु
१८९५ - गोपाळ गणेश आगरकर , समाजसुधारक, विचारवंत.

जुन 18
जन्म
१५५२ - गॅब्रियेलो चियाब्रेरा, इटालियन कवी.
१८१२ - इव्हान गॉन्चारोव्ह , रशियन लेखक .
मृत्यू
१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक.
१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, मराठी साहित्यिक

जुन 19
जन्म
१९४७ - सलमान रश्दी , ब्रिटीश लेखक

जुन 20
मृत्यु
१९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर

जुन 21
जन्म
१९०५ - ज्यॉँ-पॉल सार्त्र , फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
मृत्यु
१९२३ - सदानंद रेगे , मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
१५२७ - निकोलो माकियाव्हेली , इटलीचा राजकारणी, इतिहासकार.
१९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार

जुन 22
जन्म
१९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक.

जुन 24
जन्म
१९२७ - कवियरासू कन्नडासन, तमिळ लेखक .

जुन 25
जन्म
१९०३ - जॉर्ज ऑरवेल, इंग्लिश लेखक . 

जुन 26
जन्म
१६८१ - हेडविग सोफिया , स्वीडिश लेखक.
१८३८ - बंकिमचंद्र चटर्जी , आद्य बंगाली कादंबरीकार.
मृत्यु
२००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक

जुन 29
जन्म
१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
मृत्यु
१८७३ - मायकेल मधुसूदन दत्त , बंगाली कवी
२००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर , मराठी ऐतिहासीक कादंबरीकार.
 
संदर्भ :
http://en.wikipedia.org  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment