Popular Posts

Tuesday, 24 June 2014

लोकशाहीपासून राजकारणापर्यंत...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


लोकशाहीपासून राजकारणापर्यंत...

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

"लोकशाहीची झाली दैना
पैशाविना कुणी मतच देईना"
 
देशाच्या राज्यकारभाराची एक उत्तम पद्दती म्हणून लोकशाही शासन पद्धतीचा उल्लेख केला जातो..... जगातील बहुतेक देशांना लोकशाही शासन पद्धतीचे आकर्षण असल्याचे दिसते..... लोकशाही व्यतिरीक्त अन्य शासन पद्धती असणार्या देशातील जनतेने संघटीतपणे संघर्ष करुन लोकशाही अस्तित्वात आणली.....
पण आता चित्र बदलत चालले आहे, लोकशाहीला भ्रष्टाचाराचे ग्रहन लागले आहे..... राजकारण म्हंटले की पैसाकारण आले.....लाखो रुपयाच्या उलाढाली नेते करतात, निवडूण आल्यावर स्वतहाचे खिशे भरतात; ही सामान्य संकल्पना च होत चालली आहे......
 
प्रत्येक पक्ष असो वा नेता हा एखाद्या थोर पुरुषांचा आढावा घेउन जनतेसमोर येतो व त्यांचे पराक्रम व थोरवी सांगुन राजकारण करतात....या समाजात राजकारणी लोकांनी निवडणुकीची वेगळीच व्याख्या तयार केली.
"लोकशाही नसुन धर्मशाही मतदानाचे स्वरुप निर्माण केले"....
एवढेच नव्हे तर महात्म्यांना देखील राजकारणात ओढले..... ज्या महात्म्यांच्या नावावर हे राजकारण करतात तसे ते जरा तरी वागतात का? फक्त मते ओढण्यासाठी त्यांचा वापर करतात..... कारण या लोकांचा राजकारण हा धंदा झाला, त्यांना राजकारणाची नशा लागली आहे.... ही माणसं समाजसेवा करुच शकत नाही.....
प्रत्येक थोर पुरुषाने फक्त मानवी समाजासाठी कार्य केले, ना कुठल्याही विशिष्ट समाजासाठी.....
लोकशाही हे लोकांचे शासन असते.... हे न म्हणता आपण असं ही म्हणु शकतो की, लोकशाही हे पैशावाल्या पुढार्यांचे शासन असते.....

विचारात्मक द्रुष्टीने राजकारण समजणे शक्य होईल, जेव्हा प्रयत्न तळाला पोहोचतील.... तेव्हा देशाला आभाळासारखे आकार मिळणार व सर्वकाही ओघात सामावून घेणार, प्रगतीचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येणार......

© विपुल वर्धे.....  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment