Popular Posts

Sunday, 1 June 2014

मनापासून मनापर्यंत...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


...

काही महत्वाच्या प्रतिक्रिया....

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api
ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

नमस्कार मित्रांनो,
"मनापासून मनापर्यंत"च्या पुर्ण टिम तर्फे आपलं सहर्ष स्वागत.....
जेमतेम 7-8 जन मिळुन तयार झालेली हि आमची छोटिशी टीम..... या टिम मध्ये कुणीही प्रोफेशनली लेखक किंवा कवी वगैरे नाही..... तुमच्या सारख्याच बर्र्याच वाचकांपैकि आम्हि पण काहि लोक.....

राहुल,विक्की आणि मी (विशाल), आम्ही अतिशय जिवलग मित्र..... जेवढ्या दिवसांचं आमचं आयुष्य, तेवढ्याच दिवसांची आमची मैत्री..... आणि आमची टिम GD......
आम्हि म्हणजे फार चिल्लर लोकं..... आयुष्याच्या रस्त्यावर चालता चालता आमच्या सारखेच काहि सोबती मिळाले....... आणि हि चिल्लर संख्या वाढत गेली...... टिम च्या प्रत्येक व्यक्तिची स्वतहाची एक विशेष शैली आहे...... आणि त्यामुळेच आम्हि सर्व एकत्र बांधल्या गेलो.....
साहित्याशी सगळ्यांचं नातं तसं फार दुरचंच,कधी कधी ओठांवर येणारे शब्द कागदावर उतरवायचे..... आणि आपापसांत एकमेकांना ऐकवायचे..... तेवढ्याच दोन चार लोकांकडुन मग थोडि प्रशंसा करवुन घ्यायची आणि नंतर साल्यांकडुनच इज्जतीचे धिंदवडे काढुन घ्यायचे..... तेवढ्यातच आम्हि समाधानी......
इंटरनेटच्या जाळ्यावर ई-साहित्याच्या नव्या जगाची ओळख झाली...... काहि दिवसांअगोदर मी टिम समोर ई-मॅगझिन ची संकल्पना मांडली......सर्वांनी अपेक्षित प्रतिसाद दिला आणि "मनापासून मनापर्यंत...." या आमच्या पहिल्या वहिल्या ई-मॅगझिन निमित्त ई-साहित्याच्या या क्षेत्रात आम्हि पाउल टाकलं......

"मनापासून मनापर्यंत...." बद्दल सांगायचं म्हणजे हिंदी-मराठि साहित्याची एक छोटिशी संकलिका....... विशेष आमच्या सारख्याच साहित्य प्रेमी लोकांसाठि, मुख्यत: युवा वर्गासाठि.....!
"मनापासून मनापर्यंत...." या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाबद्दल जवळपास सर्वच मी अंकातील मनोगतात लिहिलंय, विक्किने पण संपादकीय लेखात मी विसरलेल्या बर्र्याच गोष्टी लिहिल्यात....

मॅगझिन च्या पहिल्या अंकाची लिंक खाली दिलेली आहे, डाउनलोड करा किंवा ऑनलाइन वाचा आणि आपला अभिप्राय आम्हाला नक्कि कळवा......


डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

आमच्या सारख्याच कधी कधी लिहिणार्र्या सर्व चिल्लर लोकांचं "मनापासून मनापर्यंत....."मध्ये मनापासुन स्वागत.....
आपल्या मनात चालणारी चुळबूळ कागदावर उतरवा..... आणि आमच्या पर्यन्त पाठवा...... आम्ही ती पोहोचवू.......
मनापासून मनापर्यंत......


-विशाल इंगळे
( सह-संपादक )


संपर्कासाठी......

ई-मेल करा :
1) Wardhevipul@gmail.com
2) Spicyboy247@gmail.com

किंवा मैसेज करा :
1) विपुल वर्धे - +917507865471
2) विशाल इंगळे - +919096289635

Find us on Facebook :

https://www.facebook.com/GDconnectingHEARTS

Join Facebook Group :

https://www.facebook.com/groups/310953709069469

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :

अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment