Popular Posts

Tuesday, 24 June 2014

“ नेतृत्वचूक-2”

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


“ नेतृत्वचूक-2”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

2:
बाबा तुझ्या नेत्यांची
काय गती ही झाली?
सत्तेच्या लोभापायी
दोन दिशांनी गर्दी झाली....
मंत्रीपदाचं दाखवून आमीष
त्यांनी ह्यांना खेचलं
खासदारकीची लाच देऊन
तोंड ह्यांचं दाबलं......
संघर्ष संपला नाही
अजूनही
पसरलेलं धर्माचं जाळं आहे
हृदयातील आग आणि
एकीतच
आपलं बळ आहे.....
बाबा तुझ्या नेत्यांना
नाही का हे कळलं?
बाबा या दलालांनी तुलाच विकलं
तुझ्या विचारांचा मांडणार्र्या बाजार
या भड्व्यांना
कुणी खेटरानं का नाही धुतलं?
बाबा तुझ्या विचारांना
आता इथे थारा नाही
विद्रोहाचा
क्रांतीचा आज तुझ्या
कुठेही वाहत वारा नाही......
तू चेतवलेला वणवा
ह्यांनी केला थंड आहे
तुझ्याच नावावर पुकारला ह्यांनी
तुझ्याच विरोधात बंड आहे.....

© विशाल इंगळे  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment