Popular Posts

Saturday, 4 July 2015

मनापासून मनापर्यंत. ..! (वर्ष २रे, अंक ३रा)

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ अनुक्रमणिका. .. ”


संपादकीय लेखणीतून. .. ( विपुल वर्धे )

  T.E.A.M.

  मनोगत ( विशाल इंगळे )

 फ्रॉम दि हार्ट. ..
 
  पाउस का येत नाही. .. ( विपुल वर्धे )
एक उनाडका दिवस. .. ( विशाल इंगळे )
न जाने का रुसलाय हा पाउस. ..? ( विशाल इंगळे )
वसंत. .. ( विशाल इंगळे )
अशी कशी तू. ..? ( विशाल इंगळे )
? ??. .. ( विशाल इंगळे )
पावसातली परी... ( सौरभ किर्दक )
खरंच जाणलंस तू मला. ..? ( विशाल इंगळे )
एक कोरं पान. .. ( विशाल इंगळे )
तुमसे कई ज्यादा मैंने श्याम को ढलते देखा हैं. .. ( विशाल इंगळे )
बस एकच खंत वाटते. .. ( विशाल इंगळे )
देख कलियाँ खिली है कैसे. .. ( विशाल इंगळे )
साथ. .. ( विशाल इंगळे )
उत्थानगुंफा ( विपुल वर्धे )
सारं सारं तेच आहे. .. ( विशाल इंगळे )
असंच. .. सहजच. .. ( चैताली आसोलकर )

  लोकशाहीपासून राजकारणापर्यंत. ..
 
  ब्रेकिंग न्यूज!! ( चिनार जोशी )

  समीक्षा. ..

अस्पृश्यांचा लष्करी पेशा - एक समीक्षा ( विशाल इंगळे )

  हृदयस्पर्शी

  जुलै आणि साहित्य


T.E.A.M.

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ T.E.A.M. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

Together Everyone Achieves More  


संपादक :

विपुल वर्धे

सह-संपादक :

विशाल इंगळे,
सुनिल उके,
राहुल चोपडे,
राहुल कुकलकर
 
संपादकिय मंडळ :

प्रफुल इंगळे,
ऋषिकेश लकडे,
आशिष देशमुख,
युगंधरा जिजणकर,
सायली जोशी,
सौरभ किर्दक,
दर्शिका खोने,
प्रियंका घिये

संपर्कासाठि –

  ई-मेल :

१) vishalingle25793@Gmail.com
२) Wardhevipul@Gmail.com
 
भ्रमणध्वनी क्रमांक :

१) विपुल वर्धे - +९१-९६२३६८६३८८
२) विशाल इंगळे - +९१- ७७७६९४३५१६
 
वेब अॅड्रेस :

www.gdmanapasunmanaparyant.blogspot.in

फेसबुक पेज :

https://m.facebook.com/GDconnectingHEARTS

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

देख कलियाँ खिली है कैसे. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ देख कलियाँ खिली है कैसे. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

देख कलियाँ खिली है कैसे
कल शाम जिसे तूने चूमा था
तेरे लिये या तुझे देखकर
आई है ये फूलों की बरखा?

भीगे बदन से ले अंगड़ाई
पंखुरियाँ मुस्का रही है
इस मौसम को और तन मन को
कैसे यह महका रही है

मैंने पूछा के फूलों से फिर
ये खुशबू लाई हो कहाँ से
उसने कहा उस दिल से
धड़कने तेरी धड़कती है जहाँसे

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

बस एकच खंत वाटते. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ बस एकच खंत वाटते. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

बस एकच खंत वाटते
तुला समजुच शकलो नाहि मी कधी
तुझ्यामाझ्यामध्ये अबोला नेहमीच दुरी वाटते,
तुझ्यावर केलेली प्रत्येकच कविता अपुरी वाटते;
भाव तुझ्या डोळ्यांमधला
शोधु शकलोच नाहि मी कधी
जेव्हा येतेस समोर खोटेच हसु गालांवर तुझ्या,
डोळे का पाणावलेले असतात तेव्हा तुझे?
प्रश्न नेहमीच पडतो टोचुन जातो मनाला,
का देतेस एकाकीपण मलाहि हे तुझे;
कदाचित मानले नसेलच आपले
मनाने तुझ्या कधी

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

साथ. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ साथ. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

नकोत खोटि स्वप्ने
नकोत चंद्र तारे
साथ असेल तुझी
तर झोपडितच ठेव ना रे
महालाची आशा नाहियेय मला
मिठित तुझ्या फक्त जगायंच मला...
जगु शकते तुझ्याशिवाय पण मी
पण तुझ्याशिवाय जगणे व्यर्थ आहे
तुझ्यासोबत जगलेल्या प्रत्येक
क्षणाला अर्थ आहे...
बोलता बोलताच ती अचानक शांत झाली
पाणावलेल्या डोळ्यांनी आमची नजर एक झाली
जिथे फक्त आपण दोघंच असु
दुर कुठेतरी घेउन चल मला...
असा मला तु छळतोस का रे?...
बोलायला शब्द उरलेच नव्हते
हरवले न जाने शब्द कुठे
ओठांवरचे माझ्या सारे...

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

सारं सारं तेच आहे. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ सारं सारं तेच आहे. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

बाबा, बरंच काही तसंच आहे रे...
बदललेय ते फक्त मुखवटे
वास्तविकतेचे...
तेच चित्र थाटलंय नजरेसमोर, फक्त वेगळ्या रंगात...
तू ओठांवर आहेस सर्वांच्याच,
फक्त शोधू नको मनात...
तीच विषारी व्यवस्था बांधून ठेवू पाहतेय...
फक्त कात टाकलीय आणि नव्या रुपात डसतेय...
वाटतं कधी कधी येत का नाही मरण...
नियमांच्या नावाखाली मांडल्या जाते जेव्हा शब्दांचे सरण...
चहुकडे आसमंतात पसरलेलं निळं रक्त बघ...
बघ आक्रोशाची आग विझवणारे खोटे संस्कृतीचे ढग...
सारं सारं तेच आहे....
दाबल्या जातो मनातला आकांताचा निखारा...
तसाच राहतो ओठांवरचा विद्रोही वादळी वारा...
सारं सारं तेच आहे...

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

तुमसे कई ज्यादा मैंने श्याम को ढलते देखा हैं. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ तुमसे कई ज्यादा मैंने श्याम को ढलते देखा हैं. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

शमाओं के साथ परवानों को जलते देखा हैं
तुमसे कई ज्यादा मैंने श्याम को ढलते देखा हैं
यूँ बहकाने की तू कोशिश न कर
मोहब्बत की आग में कईओ को झुलसते देखा है
घर जलाके अपना जो
चांदनी के आगोश में आँगन आ बैठे
अँधेरी रात में उनको अकेले
सिसक सिसक के रोते देखा है
न जाने कितनों को फँसाया
अपने जाल में इस छलावें ने
इस मय समंदर से निकलने के लिये
कई शराबियों को तडपते देखा हैं

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

एक कोरं पान. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ एक कोरं पान. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

काही काही पानं
कोरीच बरी असतात...
म्हणूनंच पुस्तकातलं
कुठलं न कुठलं पान कोरंच असतं...
मी पण एक पान कोरंच ठेवलं होतं...
मुद्दामच...!
पण आज रहावलंच नाही...
उठलो आणि ओरखडल्या,
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
रात्रीतल्या आठवणींच्या सावल्या...!
लिहिल्यावर वाटलं
पान जरा जास्तच काळं झालंय कदाचित...
काही शब्द खोडावी म्हंटलं
आणि ओढल्या उभ्या आडव्या रेषा...!
ऐवढी खोडताड?
आता फक्त पान राहिलंय
फाडून फेकन्याच्या लायकिचं...
फाडून गोळा केला आणि दिलं फेकून कचरापेटीत...
फाटलेलं पुस्तक कोण हाती घेइल?
कोण वाचणार या छिन्नविछिन्न अवस्थेतील
विस्कटलेली कविता...?
देवाजवळच्या दिव्यावर अचानक लक्ष गेलं...
आणि पेटवली चिता
पुस्तकाच्या एक एका पानाची...
आता त्या कोऱ्या पानांवर
कधीच लिहिणार नाही...
सांगणार ही नाही कुणाला
देवघरातल्या कागदाच्या राखेची कहानी...
काही पानं जशी असतात तशीच बरी असतात...
कोरीच...!
त्या पानावरचे शब्द
फक्त लिहिणाऱ्यासाठी असतात...
पानावर नाही, मनावर कोरलेले...!!!

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

खरंच जाणलंस तू मला. ..?

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ खरंच जाणलंस तू मला. ..? ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

खरंच जाणलंस तू मला?
  पाणी लपवून पापण्यांखाली
  ओठांवर हसू फुलविले मी...
  हसणाऱ्या ओठांना सोडून कधी
  डोळ्यांत डोळे टाकून बघितलंस?
  तुझ्याकडे सरसावनारा हात
  तुझ्याच हाताची वाट बघत होता...
  वाटलं नाही कधी?
  बघावं एकदा हात हातात घेवुन?
  गुलमोहराच्या झाडाखाली कितीतरी क्षण
  घालविले असतील न आपण...
  फुलांनी सांगितलं नाही काहीच कधी?
  कितीतरी गोष्टी बोलायच्याच राहून गेल्या...
  न बोलता ही कळतं न तुला?
  मग हिच गोष्ट का नाही कळली?
  तुझ्यापेक्षा ही जास्त चांगल्याने ओळखतो मी तुला,
  असं बोलता बोलता बोलून गेलास...
  पण चालण्याच्या वेगात
  तू जवळुन निघुन गेलास...
  आणि मी राहिली एकटीच मागे
  चुकून बघशील म्हंटलं वळुन एकदा तरी
  पण तू निघून गेलास सरळ
  एकदा ही न बघता वळुन
  अगदी नजरेआड होईपर्यंत...
  खरंच जाणलंस तू मला?

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका